मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचा महत्वाचा निर्णय काल निवडणुक आयोगाने दिला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीआधीच शरद पवार गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह हे देखील निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. यावरून आता राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेतच पंरतु मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटली, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ वाढला, असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल
राष्ट्रवादी पक्ष नाव आणि निवडणुक चिन्ह निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी देखील ट्विटवर याबाबत भाष्य केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, जनता मुर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे अशी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…वाह रे पठ्या..! मनसेने राष्ट्रवादीच्या प्रकरणात दारूगोळा भरला, अजित पवारांवर चढवला हल्ला
राष्ट्रवादी कुणाची यासंदर्भात निवडणुक आयोगात दोन्ही गटाने याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर काल निवडणुक आयोगाने निकाल दिला. यामध्ये पक्षाच्या घटनेतील उदिष्टांची केलेली तपासणी, पक्षाची घटना, पक्षामध्ये संघटना तसेच विधिमंडळ पक्षपातळीवर नक्की कोणत्या गटाकडे बहुमत आहे. याची तपासणी केल्याचे आयोगाने निकालात म्हटले आहे. या निकालाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका आता शरद पवार गटाने घेतली आहे.
दरम्यान, पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस, ५ आमदार व एका खासदाराने दोन्ही बाजूंनी पत्र दिले आहे. तसेच सध्या अजित पवार गटाकडे महाराष्ट्रातील ४१ नागालॅंचे सात तर झारखंडच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. यातच लोकसभेचे २ खासदार, विधान परिषदेतील ५ आमदार आणि राज्यसभेचा एक खासदार अस संख्याबळ असून शरद पवार गटाकडे महाराष्ट्रातील १५ आमदार, केरळमधील १ आमदार, लोकसभेचे ४ खासदार, विधान परिषदेचे ४ आमदार आणि राज्यसभेचे ३ खासदारांचा पाठिंबा आहे.
जनता मूर्ख नाही.
सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !— TEJASWWINI (@tejaswwini) February 7, 2024
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली!
हेही वाचा…“तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवू,” महेश लांडगे यांनी दिली इशारा, प्रकरण काय ?
हेही वाचा…“जेव्हा घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की…”, जंयत पाटील असे काय बोलून गेले ?
हेही वाचामोठी बातमी…! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत नार्वेकरांचा मोठा दावा, म्हणाले…