मुंबई : केंद्रीय निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शरद पवारांना याचा मोठा धक्का बसला आहे. यावरून आता अजित पवार गटांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. यातच आता मनसेने अजित पवारांचे जुने व्हिडीओ ट्विट करून या प्रकरणात आणखीनच धार दिली आहे.
हेही वाचा…“काकाचा पक्ष पुतण्याच्या ताब्यात,” राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांना, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
मनसेच्या अधिकृत पेजवर राज ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रत्नागिरीतील सभेत राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला केला होता. तोच व्हिडीओ या घडामोडीनंतर शेअर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निकालानंतर मनसेने अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. असं म्हणत मनसेने अजित पवारांना डिवचलं आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये भुजांमध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्ला पटेल का ? असं सवाल करत वाह रे पठ्या..! असंही म्हटलं आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांचा १० फेब्रुवारीपासून पुन्हा एल्गार..! सरकारला दिला पुन्हा हा इशारा
दरम्यान, यातच शिवसेना सोडल्याचा प्रसंग राज ठाकरे यांनी व्यक्त केला तो व्हिडीओ मनसेने पुन्हा ट्विट केला आहे. त्यावर काका पुतण्यांमधला ओलावा. काही मुक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात. असं म्हणत पक्षांशी गद्दारी करणाऱ्यांना डिवचलं आहे.
काका – पुतण्यांमधला ओलावा… 🧡काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात ! #बाळासाहेबठाकरे #राजसाहेबठाकरे pic.twitter.com/3cKWxoVCPB
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का?
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !… pic.twitter.com/qg916aUC3y
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, “स्वत: ला राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून उल्लेख करत..,”
हेही वाचा…“शरद पवारांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते, तेव्हा…,” सुप्रिया सुळे राष्ट्रवादी निकालाच्या विरोधात कडाडल्या
हेही वाचा…“जखमी वाघ अधिक धोकादायक असतो”, रोहित पवारांनी राष्ट्रवादीची तुलना केली महाभारताशी!
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेलं, शरद पवारांची पुढची भूमिका काय ?
हेही वाचा…मोठी बातमी…! शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरलं