पुणे : ‘राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह’ निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवारांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला निवडणुक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला आहे. यातच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पक्ष नाव आणि निवडणुक चिन्हांचं नाव सादर करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला दिले आहेत.
हेही वाचा…“जमीन विकून आलेला पैसा अन् पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही”
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरू असलेल्या याचिकेवर काल निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह यासंदर्भात मोठा निर्णय दिला. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस असून पाच आमदार आणि एका खासदाराने दोन्ही बाजूंने पत्र दिल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच यातच आता निवडणुक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे, आणि नव्या पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणे असे पर्यात आता शरद पवार गटाकडे उरले आहेत.
हेही वाचा…बाळा नांदगावकरांनी भेट म्हणून राज ठाकरेंना दिली ‘बाबरी मशिदीची वीट’, राज ठाकरे म्हणाले…
दरम्यान, निवडणुक आयोगाने आज दुपारपर्यंत शरद पवार गटाला पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह सुचवायला सांगितले आहे. शरद पवार गटाला दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल ? त्याबाबत कळवावं लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार हे नाव नव्या पक्षाचं असू शकतं. त्याचवेळी उगवता सुर्य या चिन्हासाठी पवार गट अर्ज करू शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यात सीनियर पवारांच नाव आहे. त्याचा मोठा राजकीय लाभ होईल असे पवार गटातील नेत्यांना वाटत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“काकाचा पक्ष पुतण्याच्या ताब्यात,” राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांना, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
हेही वाचाजरांगे पाटलांचा १० फेब्रुवारीपासून पुन्हा एल्गार..! सरकारला दिला पुन्हा हा इशारा
हेही वाचा…दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, शर्मिला ठाकरेंकडून लोकसभेचे संकेत
हेही वाचा…*“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, आयत्या प्रकल्पांवर उबाठा,” भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटवॉर*
हेही वाचा…“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेला शरद पवार गटाचा विरोध”, म्हणाले….