मुंबई : गेल्या ५०० वर्षापेक्षा अधिक दिर्घकाळानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारण्यात आलं. यातच बाबरी मशिद पाडण्यासाठी अनेक कारसेवकांनी यामध्ये बलिदान दिलं आहे. यात महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा मोलाचा वाटा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशिदीची वाट शिवतीर्थावर आणली. त्यानंतर ही वीट बाळा नांदगावकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट म्हणून दिली.
हेही वाचा…“नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात”, अजित पवार अन् आव्हाडांमध्ये वाकृयुद्ध
6 डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरीचा ढाचा पडला. त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते. त्यात बाळा नांदगावकर यांचाही समावेश होता. तो ढाचा जेव्हा पडला. तेव्हा तिथली वीट बाळा नांदगावकर घेऊन आले होते. त्यांच्याकडे अशा दोन वीटा आहेत. ही वीट हातात घेतली तर याचं वजन पाहून लक्षात येतं की त्यावेळचं बांधकाम कसं होतं. तेव्हाचे कन्ट्रक्शन्स का चांगले होते? कारण तेव्हा टेंडर्स निघत नव्हते. असं राज ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा…“लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकाही लागू शकतात, फक्त एक महिना बाकी “
पुढे बोलतांना ते म्हणाले की, बाळा नांदगावकर यांनी दिलेली वीट म्हणजे ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला राम मंदिर ज्या वीटांना बांधलं, त्याचीही वीट आणायची आहे. म्हणजे जी उरली असेल ती. मंदिर अजून बांधायचं आहे. पुर्ण व्हायचंय. ती एक वीट मी लवकरच मिळवेन. आज बाळासाहेबांना खुप आंनद झाला असता. असेही ते म्हणाले.
दरम्यान, कारसेवक म्हणून गेलो तेव्हा आम्हाला माहितही नव्हतं की जिवंत येऊ की नाही. पण बाळासाहेबांचा आदेश होता आणि तिथला सगळा परिसर राममय झाला होता. फक्त जय श्रीरामच्या घोषणा देत ढाचा पाडला होता. जेव्हा कधी भविष्यात त्याठिकाणी राम मंदिर होईल. तेव्हा ती वीट मी बाळासाहेबांना भेट देईन, अशी माझी इच्छा होती. त्याला आज ३२ वर्षे झाली. पण आता बाळासाहेब नाहीत. पण आमच्या दृष्टीने आमचे राजसाहेबच बाळासाहेब आहेत. म्हणून मी त्यांना वीट भेट दिली. अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…“पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली, महायुतीचा 155 कोटींचा मोबाईल घोटाळा”
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी मनसेचा पुढचा उमेदवार कोण ?” शर्मिला ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत
हेही वाचा…मोठी बातमी….! कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अजित पवारांची आख्खी फॅमिली लागली कामाला
हेही वाचा…“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल..,” वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“इच्छूक उमेदवारांचा पुण्यात अध्यात्मिक कार्यक्रमांवर भर”, पुणे लोकसभेसाठी स्पर्धा वाढली