पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी सध्या भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरू झाली आहे. पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्वेत आपलं नाव चर्चेत राहावं तसेच वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्याच नावाची चर्चा व्हावी, यासाठी भाजपच्या इच्छूकांनी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी अध्यात्मिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. शहरात एकाने कार्यक्रम घेतला की लगेचच दुसरा कार्यक्रमाचं आयोजन करतांना दिसत आहे. त्यामुळे पुण्यात सध्या भाजपच्या इच्छूकांची चर्चा अधिक सुरू झाली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांवरील टिका अजित पवारांना भोवली,” टिका झाल्यानंतर दिलं मोठं स्पष्टीकरण, म्हणाले…
पुणे लोकसभेसाठी भाजपकडून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पुणे शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहराचे माजी महापौर आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर, तसेच फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर हे इच्छूक आहेत. यामध्ये मोहोळ आणि मुळीक यांच्यात चांगलीच स्पर्धा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडून गुंडाची पक्षात भरती,” विरोधकांचा हल्लाबोल
मुरलीधर मोहोळ यांनी प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अपने अपने राम हा कार्यक्रम घेतला होता. यामध्ये प्रसिद्ध वक्ते डॉ. कुमार विश्वास यांचा हा कार्यक्रम स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर झाला. या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी दिसून आली. तर त्याच धर्तीवर आता जगदीश मुळ यांनी देखील पुणेकरांसाठी राम कथा सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी विश्व विख्यात अध्यात्मिक प्रवक्ता जया किशोरी यामध्ये श्रीराम कथा सांगणार आहेत. येत्या शनिवारी १० फेब्रवारीला संगमवाडी येथे कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, जया किशोरी यांचा हा महाराष्ट्रातला पहिलाच कार्यक्रम असल्याचा दावा मुळीक यांच्याकडून करण्यात येत आहे. याआधी जगदीश मुळीक फाऊंडेशनने बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा यांच्या हनुमान कथा सत्संगाचे आयोजन केले होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूकांनी पुण्यात अध्यात्मिक कार्यक्रमांवर भर दिल्याचं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात”, अजित पवार अन् आव्हाडांमध्ये वाकृयुद्ध
हेही वाचा…“लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकाही लागू शकतात, फक्त एक महिना बाकी “
हेही वाचा…पियुष गोयल यांच्यासाठी मुंबईतील ‘हा’ लोकसभा मतदारसंघ ठरला, सर्वाधिक मताधिक्क्यांनी विजयी होणाऱ्या खासदाराचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा…सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, राष्ट्रवादीत संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हे
हेही वाचा…मोदींच्या फोटोला काळं फासणं पडलं महागात, कॉंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊतांना अटक