नागपूर : विकसित भारत संकल्पना यात्रेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता जिल्हा परिषद कार्यालय परिसरात बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर केंद्र सरकार ऐवजी मोदी सरकार असल्याने कॉंग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह २० ते २५ समर्कांनी मोदींच्या नावाला काळे फासले, तिथे मोदींचे नाव हटवून भारताचे स्किटर लावले. याप्रकरणी कुणाल राऊत यांना पोलिसांनी कुही येथून रविवारी अटक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…ठरलं तर, तोफ धडाडणार..! वळसे पाटलांच्या होमपिचवर शरद पवारांची सभा, कोल्हेंना मिळणार मोठी ताकद
केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार’ ऐवजी मोदी सरकार असं छापण्यात आलं आहे. हे संविधान विरोधी आहे. पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे, ही अक्षम्य चूक महाराष्ट्रभर युवक, शेतकरी, महिलांनी स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. याविरोधात लेखी निवेदन दिले गेले. निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली. मात्र सरकार चूक दुरुस्त करायला तयार नाही. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेसमोरील या जाहिरातीच्या बोर्डला काळे फासून आपला संताप व्यक्त केला. यामुळे चिडलेल्या भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांचा गैरवापर करून आमच्या युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक केली असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटलांसह ओबीसी समाजीची मोठी दिशाभूल, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद ?”
दरम्यान, कुणाल राऊत सातत्याने बेरोजगारी, महागाई, नोकर भरतीतील भ्रष्टाचार याविरोधात रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहे. राज्यभरातील युवकांचा ‘शिंदे – फडणवीस – पवार’ सरकारवरचा रोष युवक काँग्रेस, काँग्रेसच्या आंदोलनातून व्यक्त होत आहे. हे थांबवण्यासाठीची ही अटक आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष या प्रसंगी कुणाल राऊत आणि त्याच्या युवक काँग्रेस मधील सहकाऱ्यांसोबत आहे. अनैतिक, बेकायदेशीर, असंवैधानिक सरकारने केलेली ही अटक तानाशाही प्रवृतीची आहे. याचा निषेध करत असल्याचेही पटोले म्हणाले.
केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार’ ऐवजी मोदी सरकार असं छापण्यात आलं आहे. हें संविधान विरोधी आहे. पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे, ही अक्षम्य चूक महाराष्ट्रभर युवक, शेतकरी, महिलांनी स्थानिक प्रशासनाच्या… pic.twitter.com/KYpkDmLf42
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांवरील टिका अजित पवारांना भोवली,” टिका झाल्यानंतर दिलं मोठं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडून गुंडाची पक्षात भरती,” विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचा….“तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही…,” शरद पवारांवर टिका, अजित पवारांना शरद पवार गटाने सुनावलं
हेही वाचा…“आमच्या फंदात न पडता स्वतःच्या ढोंगी हिंदुत्वाकडे लक्ष द्या”, ठाकरे गटाचा भाजपवर जोरदार पलटवार
हेही वाचा.“त्यामुळे गणपत गायकवाड अन् महेश गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये गेले”, अन्….