मुंबई : जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून आता भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. यातच आता गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा….“गुन्हेगारांचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे का ?” विरोधकांचा राज्य सरकारला सवाल
द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीच्या मालकाने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता दिलेल्या तक्रारीवरून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अवघ्या दीड तासांतच पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. तसेच ३१ जानेवारीला जमिनीच्या वादातून एकनाथ जाधव यांच्या कुटुंबीयांना गायकवाड यांच्यासह समर्थकांनी जातिवाचक शिवीगाळ केली , अशी तक्रार मधुमती उर्फ नीता जाधव यांनी २ फेब्रुवारीला रात्री दिली होती. त्यानुसार गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारेख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश वारघेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा…गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत कोठडी, कोर्टात जोरदार युक्तिवाद
दरम्यान, २ फेब्रवारीला दुपारी तीन वाजता महेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी वादग्रस्त जागेवरील कंपाऊंडचे पोल फेकून दिले होते. या प्रकरणी मे. फेअरडील डेव्हलपर्सचे भागीदार जितेंद्र पारिक यांच्या तक्रारीवरून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पुर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या वादातून गायकवाड आणि महेश गायकवाड पोलिस ठाण्यात गेले होते.
READ ALSO :
हेही वाचा…ठरलं तर, तोफ धडाडणार..! वळसे पाटलांच्या होमपिचवर शरद पवारांची सभा, कोल्हेंना मिळणार मोठी ताकद
हेही वाचा…“जरांगे पाटलांसह ओबीसी समाजीची मोठी दिशाभूल, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद ?”
हेही वाचा..तर सुनील तटकरेंचा रायगड लोकसभा मतदारसंघात गेम होणार ? ठाकरेंच्या सभांमुळे तटकरेंना फुटला घाम
हेही वाचा…“तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यासाठी बारणेंनी पहिला कामाचा अहवाल द्यावा”, मावळात लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत मोठी धुसफूस
हेही वाचा..“तर पेट्रोलच्या टाकीवर पाण्याची टाकी लिहून ते आगीवर ओतायला लावतील”,अजित पवार गटाने आव्हाडांना डिवचलं