मुंबई : शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. यानंतर कोर्टाने गणपत गायकवाड यांच्यासह अन्य दोघांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्याचे कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा…“राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर..”प्रकाश आंबेडकरांची गोळीबार प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया
जमिनाचा वाद मिटवण्यासाठी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. परंतु पोलिस स्टेशनमध्येच दोघांमध्ये वाद चिघळण्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्या दिशेने फायरिंग करण्यास सुरूवात केली. महेश गायकवाड यांच्यासह अन्य दोघांवर देखील गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर तातडीने पोलिस आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा…“पोलिसांसमोरच गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे”, सुप्रिया सुळेंची मागणी
दरम्यान, गणपत गायकवाड यांच्यासह पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. आज तिघांनाही कोर्टात हजर करण्यात आले. त्याआधी गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तर याप्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी होईल. असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यसभा निवडणुक..! “सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करायला हवा”
हेही वाचा…“त्या आरोपातून तुम्ही आता अडवाणींना दोषमुक्त केलं आहे का ?”, प्रकाश आंबेडकरांचा भाजपला सवाल
हेही वाचा..मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रूपये बुडवल्याचा गायकवाडांचा आरोप, एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात ?
हेही वाचा.“राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”, आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली..!
हेही वाचा…भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, शरद पवार म्हणाले..