ठाणे : कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या या गोळीबारात महेश पाटील यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने ज्युपीटर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा..“आपला ‘बॉस सागर’ बंगल्यावर बसलाय या कॉन्फिडन्समध्ये भाजप आमदाराचा गोळीबार,” प्रकरण तापलं
पोलिसांच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चालललंय तरी काय ? गुंडाराज आहे हे. हा महाराष्ट्र छत्रपतींचा, शाहू, फुले आंबेडकरांचा आहे. अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गॅंगवॉंर चालले असतील आणि त्या पोलिस स्टेशनमध्ये सत्तेमध्ये असलेले आमदार करत असतील तर याच्यावर स्ट्रॅंग अॅक्सन झाली पाहिजे. अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मी हा मुद्दा इथे नाही तर दिल्ली दरबारी सोमवारी संसदेत उचलणार आहे. मी स्वत: देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागणार आहे. असेही सुळे म्हणाल्या.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील”, गो’ळी’बा’र प्रकरण..!
दरम्यान, महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार का केला ? याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी या प्रकरणानंतर सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितलं होतं. परंतु पक्ष श्रेषठींनी त्याची दखल घेतली नाही. उल्हासनगरच्या द्वारली गावात मी १० वर्षांपुर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने संबंधित जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. काल महेश गायकवाड कम्पाऊंट तोडून जागेचा ताबा घेऊ पाहत होते.
READ ALSO :
हेही वाचा..“सहा गोळ्या झाडल्या, मग थेट महेश गायकवाडांच्या उरावर बसले”, घटनेचा धक्कादायक सीसीटिव्ही व्हिडीओ समोर
हेही वाचा..“लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार”,एकनाथ शिंदे म्हणाले.. की
हेही वाचा…“भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”
हेही वाचा…मोठी बातमी….! लालकृष्ण आडवाणी यांना “भारतरत्न पुरस्कार” जाहीर, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
हेही वाचा….“संजय गायकवाड तुझं ‘राजकीय कवाड’ ओबीसी व मराठा मिळून बंद करतील”, अन् रूपाली पाटील संतापल्या