मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमीनीच्या वादातून शिंदे गटाचे प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमीनीचा वाद सोडविण्यासाठी दोघांना पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याने कायदा -सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली असून या घटनेवरून त्यांनी संतापही व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला, हातकणंगलेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचं निधन
एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे साहेबांसोबत गद्दारी केली, ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहे. एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे. एकनाथ शिंदेंनी माझे करोडो रुपये खालले, त्यांनी आणि त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मी मांडल्या पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही. असं महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला आज खालीली गोष्टींची खात्री पटलेली असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी भाजपवर चढवला आहे.
हेही वाचा…“ईडीला हाताशी धरून सुडाच्या राजकारणावरून भापजला फटका बसणार ?” राज ठाकरेंचा हल्लाबोल
१. एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० आमदार हे गद्दार आहेत हे भाजपला देखील मान्य आहे.
२. स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकमेकांसोबत पुढे सुद्धा गद्दारी करतील.
3. महाराष्ट्रात आज गुन्हेगार आणि गुंडांच राज्य आहे, त्यामुळे सामान्य माणसाला घाबरून गप्प बसण्यापलीकडे पर्याय नाही.
4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गुंडांची जी दादागिरी महाराष्ट्रभर सुरू आहे याची त्याची पूर्ण माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती असे खुद्द भाजप आमदार सांगत आहे तरी यावर कारवाई होत नाही.
सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला. सत्ताधारी आमदार पोलिस स्थानकात गोळीबार करत आहे, सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहे,सत्तेचा माज, बंदूकीचा वापर, बदला हे सगळं आज महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. महाराष्ट्रात जे सुरू आहे तीच खरी मोदींची गॅरंटी आहे! अशी टिका देखील विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे.
एकनाथ शिंदेनी उध्दव ठाकरे साहेबांसोबत गद्दारी केली, ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहे.
एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील.
महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे.
एकनाथ शिंदेंनी…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंच्या राजवटीत गुंड, टोळ्यांच्या हातात कायदा ; भाजप आमदाराचा गोळीबार, विरोधक संतापले
हेही वाचा…शिंदे गटातील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार का केला ? भाजप आमदारने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले….
हेही वाचा..भाजपच्या ‘या’ आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गो’ळी’बा’र’, थरारक घटना
हेही वाचाराज्य सरकारचा मोठा निर्णय, मनोज जरांगे पाटलांना आता सरकारची सुरक्षा, पोलिस तैनात
हेही वाचा…“उद्धव ठाकरे जे वचन देतो, ते पूर्ण करतो”, ठाकरेंनी थेट मोदींना डिवचलं