ठाणे : भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा- सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळ्या काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. राहुल जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू असून भाजप आमदारासह तीन जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“कोस्टल रोड, महाविकास आघाडीचा प्रकल्प… निवडणूक तोंडावर पंतप्रधान अर्धवट कामाचे उद्घाटन करणार!”
आमदार गणपत गायकवाड यांनी या प्रकरणानंतर सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितलं होतं. परंतु पक्ष श्रेषठींनी त्याची दखल घेतली नाही. उल्हासनगरच्या द्वारली गावात मी १० वर्षांपुर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने संबंधित जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. काल महेश गायकवाड कम्पाऊंट तोडून जागेचा ताबा घेऊ पाहत होते.
हेही वाचा…संजय गायकवाडांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक, गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन आंदोलन
काल संध्याकाळी जवळपास ४०० ते ५०० जण घेऊन महेश गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये आले. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील. तर माझा जगून तरी काय फायदा ? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होत नाही. अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या घटनांमध्ये गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. जागेच्या वादातून गोळीबार केल्याची घटना झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या करण्याच्या उद्देशाने एकापाठोपाठ असे सहा राऊंड फायर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचाराज्य सरकारचा मोठा निर्णय, मनोज जरांगे पाटलांना आता सरकारची सुरक्षा, पोलिस तैनात
हेही वाचा…“उद्धव ठाकरे जे वचन देतो, ते पूर्ण करतो”, ठाकरेंनी थेट मोदींना डिवचलं
हेही वाचा…कॉंग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला, हातकणंगलेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचं निधन
हेही वाचा…“ईडीला हाताशी धरून सुडाच्या राजकारणावरून भापजला फटका बसणार ?” राज ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा“तर मी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार”, वडेट्टीवारांनी उपोषणाचा का दिला इशारा?