नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने गेले काही महिने पक्षातील पदाधिकारी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन महाराष्ट्र सैनिकांशी बोलत आहेत, त्या त्या मतदारसंघाची चाचपणी करत आहेत.. कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत याचा आढावा घेत आहेत. आणि ही प्रक्रिया सर्व राजकीय पक्ष करत असतात. यांच्याकडे केंद्र आणि राज्याची सत्ता आहे ते जर करत असतील तर आम्ही का करू नये? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. नाशिक येथील पत्रकारांशी ते बोलत होते.
हेही वाचा…“महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात, गेंड्याच्या कातडीचे सरकार कारवाई का करत नाही” ?
प्रभू श्रीराम मंदिराबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी अयोध्येला जाणार हे नक्की पण सध्या तिकडे प्रचंड गर्दी आहे. मी असं ऐकलं की रोज १० लाख लोकं भेट देत आहेत. तिकडचं सगळं सुस्थितीत आलं की जाईन. तोपर्यंत रामाचं दर्शन घ्यायचं असलं तर नाशिकचं काळाराम मंदिर आहेच. असे सांगितले.
दरम्यान, मराठी शाळा बंद होण्याचं प्रमाण महाराष्ट्रभर वाढतं आहे, त्यावर मागे शासनाला एक उपाय सुचवला होता की सेमी-इंग्रजी शाळा सुरु करा. कारण हल्ली पालकांना पण असं वाटत असतं की आपल्या मुलांना चांगलं इंग्रजी यायला हवं, त्यासाठी त्यांचा अट्टहास हा इंग्रजी शाळेसाठी असतो. अशावेळेस जर शाळेत इंग्रजी आणि मराठी दोन्हीला योग्य महत्व देणारं शिक्षण मिळणार असेल तर पालक तो पर्याय नक्की निवडतील. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“आज शिवराय असते तर शेलारांसारख्या प्रवृत्तीला संपवण्यासाठी कडेलोट केला असता”, रोहित पवारांची जोरदार टिका
ईडीला हाताशी धरून सुडाचं राजकारण जे सुरु आहे, किंवा एकूणच सत्तेचा वापर करून जे राजकारण केलं जात आहे त्याचा फटका कधी ना कधी भाजपला पण बसणार आहेच ना. कारण भाजप पण काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. ते जेंव्हा सत्तेच्या बाहेर जातील तेंव्हा नवीन येणारे दामदुपटीने ह्यांचा हिशोब करतील. आज भाजपवाले म्हणतात की इंदिराजींच्या काळात पण नाही का सत्तेचा दुरुपयोग झाला. पण म्हणून तुम्ही करायचा ह्याला काहीच अर्थ नाही. असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा“तर मी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार”, वडेट्टीवारांनी उपोषणाचा का दिला इशारा?
हेही वाचा…“कोस्टल रोड, महाविकास आघाडीचा प्रकल्प… निवडणूक तोंडावर पंतप्रधान अर्धवट कामाचे उद्घाटन करणार!”
हेही वाचा…संजय गायकवाडांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक, गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन आंदोलन
हेही वाचा…“विजयोत्सव साजरा झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? “राज ठाकरेंचा जरांगे पाटलांना सवाल
हेही वाचा“भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढा,” शिंदे गटाच्या आमदाराची मागणी, छगन भुजबळ म्हणाले…