मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांची सगेसोयऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यावर राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: तो अध्यादेश जरांगे पाटलांच्या हातात दिला आहे. परंतु यावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला असून राज्यभरात ओबीसी जनजागृती यात्रा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. यातच आता मराठा आरक्षणाचा विरोध करत असेल तर भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढून टाका असं विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे. त्यावर आता भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश
मंत्रिमंडळातील सदस्य छगन भुजबळ ज्या तिरस्काराची भूमिका घेऊन बाहेर आले आहेत. हा तिरस्कार योग्य नाही. अशा मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेवायला पाहिजे नाही. त्यांना बाहेर काढले पाहिजे. असं म्हणत संजय गायकवाड यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून हाकालण्याची भाषा केली होती. तसेच कोणत्याही समाजाचं मागच्या दाराने आरक्षण काढलेलं नाही. राहिला यात्रा काढण्याचा धंदा छगन भुजबळ यांनी केला नाही पाहिजे. भुजबळांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे की त्यांनी भुजबळांना बाहेर काढलं पाहिजे. असेही संजय गायकवाड म्हणाले.
हेही वाचा…“१० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता…”मोदींचा काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून काढा. मला मंत्रिमंडळात ठेवायचा, काढायचा हा मुख्यमंत्र्यांचा सर्वश्री अधिकार आहे. तो मला मान्य आहे. दुसरी गोष्ट आहे जी कमरेत लाथ घालण्याची गोष्ट आहे. ते असं करणार नाहीत. तसेच मंत्रिमंडळातून त्यांनी मला कधीही काढलं तर त्याचं मला दु: ख वाटणार नाही. अशी प्रतिक्रिया देखील छगन भुजबळ यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात, गेंड्याच्या कातडीचे सरकार कारवाई का करत नाही” ?
हेही वाचा…“आज शिवराय असते तर शेलारांसारख्या प्रवृत्तीला संपवण्यासाठी कडेलोट केला असता”, रोहित पवारांची जोरदार टिका
हेही वाचा“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा