पुणे : भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा एक मोठी डेअरिंग केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी थेट पाषणमधील एका मटक्याच्या अड्यावर धाड टाकली आहे. पुण्याची संस्कृती आणि सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे म्हणत सर्व पुरावे जमा करून त्यांनतर मेधा कुलकर्णी यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे त्यांच्या या धाडसाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली, तिन्ही पक्षांना सामावून घेण्यासाठी समन्वय समितीची स्थापना
मेधा कुलकर्णी यांनी याआधी चार वर्षापुर्वी कोथरूडमधील लक्ष्मीनगरचा दारूअड्डा, तोही हातभट्टीचा उद्धवस्त केला होता. त्यानंतर त्यांनी आज पाषणामधला मटक्याचा अड्डा गाठला. तेथील चिठ्ठ्यांवरचे थेट आकडे म्हणजे नोंदीच तपासल्या. मेधाताई असं कुठल्या मटक्याच्या अड्ड्यावर गेल्या. तिथले प पर तपसाले. त्याचं शुटींगही केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवले.
हेही वाचा…“महाराष्ट्र रामशास्त्रांच्या छ’दाम शास्त्र्यांचा नाही”, ठाकरे गटाचा नार्वेकरांवर हल्लाबोल
यासंदर्भात त्या म्हणाल्या की, काल बालाजी चौक पाषाण, सुस रोड येथील राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध मटका, बेटींग अड्ड्यावर छापा टाकला आणि पुढील कारवाई पोलिसांना बोलून घेतले. पुणे शहरातील अवैध दारू, मटके यांचे प्रमाण खूप वाढले आहे. या अड्ड्याचे चालक मोकाट कसे फिरत आहेत ? जर सर्वसामान्य नागरिकांनी ही ठिकाणे माहित आहेत तर पोलिसांना कळतीलच मग यांचे समूळ उच्चाटन का करीत नाहीत ? असा सवाल देखील कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, यातूनच मग पुढे गुन्हेगारीची सुरूवात होते. अनेक कुटुंबे उद्धवस्त होत आहे. तरूणाईला वाईट वळण लागत आहेत. पुण्याची संस्कृती आणि सुरक्षितता धोक्यात येत आहे. पुणे पोलिसांनी स्वत : याची दखल घेऊन बीमोड करणे आवश्यक आहे. पीआय बालाजी पांढरे, पीआयएस सोनावणे यांनी कारवाई केल्याचेही कुलकर्णी यांनी म्हटले.
काल बालाजी चौक पाषाण, सुस रोड येथील राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध मटका , बेटींग अड्ड्यावर छापा टाकला आणि पुढील कारवाई करण्यास पोलिसांना बोलावून घेतले.
पुणे शहरातील अवैध दारू, मटके यांचे प्रमाण खूप वाढले आहे.
या अड्ड्याचे चालक मोकाट कसे?
जर सर्वसामान्य नागरिकांनाही ही ठिकाणे… pic.twitter.com/8l6aly50yu— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) January 13, 2024
READ ALSO :
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश
हेही वाचा…“१० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता…”मोदींचा काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात..” नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
हेही वाचा…“१४ तारखेला महायुतीचा महामेळावा”, मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार ?
हेही वाचा…“मोदीजी पंतप्रधान झाले अन् विकास कामांना गती मिळाली”, फडणवीसांकडून मोदींचं भरभरून कौतूक