मुंबई : दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या जागेवरून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याने काॅंग्रेसचे नेते मिलिंद देवरा नाराज असून ते लवकरच शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याठिकाणी मागच्या वर्षी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून मिलिंद देवरा यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
हेही वाचा…“मोदीजी पंतप्रधान झाले अन् विकास कामांना गती मिळाली”, फडणवीसांकडून मोदींचं भरभरून कौतूक
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा निवडणुक लढविण्यास इच्छूक आहेत. परंतु जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे जाणार असल्याने मिलिंद देवरा यांचा पुन्हा निवडणुक लढवण्यास भ्रमनिवास झाला आहे. त्यामुळे ते आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
दिवंगत काॅंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे मिलिंद देवरा पुत्र आहेत. त्यांचे वडिल २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून ते विजयी झाले होते. मुरली देवरा यांना डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांच्याकडून देवरांचा पराभव झाला होता.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली, तिन्ही पक्षांना सामावून घेण्यासाठी समन्वय समितीची स्थापना
महाविकास आघाडीच्या जागावाटपात दक्षिण मुंबईची जाग ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने देवरा नाराज असल्याची चर्चा आहे. यातच मिलिंद देवरा यांची साथ मिळाली तर शिंदे गट मुंबईमध्ये वेगाने शिवसेना वाढू शकते. तसेच त्यांच्या मनात असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारावं अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश
हेही वाचा…“१० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता…”मोदींचा काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात..” नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
हेही वाचा…“१४ तारखेला महायुतीचा महामेळावा”, मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार ?