सोलापूर : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांची सगेसोयऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यावर राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: तो अध्यादेश जरांगे पाटलांच्या हातात दिला आहे. परंतु यावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला असून राज्यभरात ओबीसी जनजागृती यात्रा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. यातच आता मराठा आरक्षणाचा विरोध करत असेल तर भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढून टाका असं विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे. त्यावरून आता अजित पवार गट आक्रमक झाला आहे.
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
मंत्री छगन भुजबळा यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अजित पवार गट सोलापुरात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दहन आंदोलन करण्यात आलं. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. यावेळी भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा
मंत्रिमंडळातील सदस्य छगन भुजबळ ज्या तिरस्काराची भूमिका घेऊन बाहेर आले आहेत. हा तिरस्कार योग्य नाही. अशा मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेवायला पाहिजे नाही. त्यांना बाहेर काढले पाहिजे. असं म्हणत संजय गायकवाड यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून हाकालण्याची भाषा केली होती. तसेच कोणत्याही समाजाचं मागच्या दाराने आरक्षण काढलेलं नाही. राहिला यात्रा काढण्याचा धंदा छगन भुजबळ यांनी केला नाही पाहिजे. भुजबळांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे की त्यांनी भुजबळांना बाहेर काढलं पाहिजे. असेही संजय गायकवाड म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“विजयोत्सव साजरा झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? “राज ठाकरेंचा जरांगे पाटलांना सवाल
हेही वाचा“भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढा,” शिंदे गटाच्या आमदाराची मागणी, छगन भुजबळ म्हणाले…
हेही वाचा…“महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात, गेंड्याच्या कातडीचे सरकार कारवाई का करत नाही” ?
हेही वाचा…“आज शिवराय असते तर शेलारांसारख्या प्रवृत्तीला संपवण्यासाठी कडेलोट केला असता”, रोहित पवारांची जोरदार टिका
हेही वाचा“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं