पुणे : राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याची घोषणा भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर संताप व्यक्त करत भुजबळांच्या कंबरेत लाथ मारून त्यांना हाकलून देण्याची भाषा केली. त्यावरून अजित पवार गटातील नेते संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा…राज्य सरकारचा मोठा निर्णय, मनोज जरांगे पाटलांना आता सरकारची सुरक्षा, पोलिस तैनात
भुजबळांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टिका केली आहे. संजय गायकवाड हे स्वत: च ओबीसी असल्याचे माध्यमासमोर येऊन सांगत आहेत. जिभ कापण्याची भाषा करणारा संजय गायकवाड तुझं राजकीय कवाड आणि ओबीसी व मराठा मिळून बंद करतील. मराठा बांधवांची किती फसवणूक करणार आहात ? असा सवालही रूपाली पाटील यांनी केला आहे. तसेच ओबीसी व मराठा बांधवात तणाव निर्माण करणारे चेहरे हळूहळू बाहेर पडत आहेत. लाथ बसली असंही रूपाली पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे जे वचन देतो, ते पूर्ण करतो”, ठाकरेंनी थेट मोदींना डिवचलं
दरम्यान, छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टिकेच्या निषेधार्थ पंढरपुरात सकल ओबीसी बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी संजय गायकवाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. तसेच असे वक्तव्य पुन्हा केल्यास त्यांना महाराष्ट्रभर फिरणं मुस्शिल करू व पंढरपुरात आल्यास त्याचे तोंड काळे करू असा इशाराही त्यांनी दिला.
READ ALSO :
हेही वाचा..“आपला ‘बॉस सागर’ बंगल्यावर बसलाय या कॉन्फिडन्समध्ये भाजप आमदाराचा गोळीबार,” प्रकरण तापलं
हेही वाचा“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील”, गो’ळी’बा’र प्रकरण..!
हेही वाचा…शिंदेंच्या राजवटीत गुंड, टोळ्यांच्या हातात कायदा ; भाजप आमदाराचा गोळीबार, विरोधक संतापले
हेही वाचा…शिंदे गटातील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार का केला ? भाजप आमदारने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले….
हेही वाचा..भाजपच्या ‘या’ आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गो’ळी’बा’र’, थरारक घटना