मुंबई : जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस स्टेशनमध्येच ही घटना घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा आता सीसीटिव्ही फुटेज समोर आला आहे. त्या व्हिडीओ मध्ये गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करतांना दिसत आहेत.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील”, गो’ळी’बा’र प्रकरण..!
गेल्या काही दिवसांपासून आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून वाद सुरू आहे. हा वाद सोडविण्यासाठी पोलिसांना त्यांना उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात बोलवले होते. यावेळी हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू असतांना हा वाद आणखी चिघळला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एका साथीदाराने आपल्याकडी बंदूक काढून अंदाधूंद गोळीबार केला. यामध्ये महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या. महेश पाटील यांच्यावर चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या आहेत.
हेही वाचा…शिंदेंच्या राजवटीत गुंड, टोळ्यांच्या हातात कायदा ; भाजप आमदाराचा गोळीबार, विरोधक संतापले
दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या कॅबिनमध्ये चर्चा करीत असतांना गणपत गायकवाड यांनी समोर बसलेल्या तिघांवर अंधाधुंद फायरींग केल्याचे दिसत आहे. गणपत गायकवाड यांनी गोळीबार करताच तिथून दोघे जण दरवाज्याकडे पळत सुटले. त्यानंतर बाहेरून आलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांना पकडले. तर गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्या दिशेने गेले. त्यानंतर गणपत गायकवाड गोळ्या घालून उरावर बसल्याचंही दिसून येत आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा गोळीबाराचा सीसीटिव्ही फुटेज समोर : शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर झाडल्या सहा गोळ्या pic.twitter.com/Glkcf48nMf
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) February 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार”,एकनाथ शिंदे म्हणाले.. की
हेही वाचा…“भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”
हेही वाचा…मोठी बातमी….! लालकृष्ण आडवाणी यांना “भारतरत्न पुरस्कार” जाहीर, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
हेही वाचा….“संजय गायकवाड तुझं ‘राजकीय कवाड’ ओबीसी व मराठा मिळून बंद करतील”, अन् रूपाली पाटील संतापल्या
हेही वाचा..“आपला ‘बॉस सागर’ बंगल्यावर बसलाय या कॉन्फिडन्समध्ये भाजप आमदाराचा गोळीबार,” प्रकरण तापलं