मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात महेश पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आता विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. त्यावरून आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार का केला ? भाजप आमदारने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले….
गोळीबार प्रकरणाची तपास गुन्हे शाखा करणार असून आता एसीपी रॅंकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे. यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, कल्याणची घटना गंभीर आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता. त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार झाला. याचाही तपशील बाहेर काढावा लागेल. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीजींना आदेश दिले आहेत. यासंदर्भात अत्यंत कडक कारवाई केली जाईल. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
हेही वाचा….भाजपच्या ‘या’ आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गो’ळी’बा’र’, थरारक घटना
दरम्यान, आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यात आमदार गणपत गायकवाड आणि हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांचा समावेश आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड व इतर दोन फरार झाले आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सध्या सुरू आहे. आज दुपारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी….! लालकृष्ण आडवाणी यांना “भारतरत्न पुरस्कार” जाहीर, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
हेही वाचा….“संजय गायकवाड तुझं ‘राजकीय कवाड’ ओबीसी व मराठा मिळून बंद करतील”, अन् रूपाली पाटील संतापल्या
हेही वाचा..“आपला ‘बॉस सागर’ बंगल्यावर बसलाय या कॉन्फिडन्समध्ये भाजप आमदाराचा गोळीबार,” प्रकरण तापलं
हेही वाचा“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील”, गो’ळी’बा’र प्रकरण..!
हेही वाचा…शिंदेंच्या राजवटीत गुंड, टोळ्यांच्या हातात कायदा ; भाजप आमदाराचा गोळीबार, विरोधक संतापले