मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या आहेत. पोलिस स्टेशनमधून गोळीबार करून गणपत गायकवाड यांनी याप्रकरणाबाबत माध्यमांशी प्रतिक्रिया दिली असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मनस्तापामुळे गोळीबार केल्याचं स्पष्टीकरण गणपत गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा..“लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार”,एकनाथ शिंदे म्हणाले.. की
यातच कोट्यवधी रूपये बुडवल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात ? गणपत गायकवाड नक्की कोणत्या व्यवहाराला घेऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप करत आहेत ? या वक्तव्यांमागे महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं लपलेली असू शकतात म्हणून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि हा पैशांचा गोलमाल जनतेसमोर यावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
हेही वाचा…“भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”
दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचे वाटोळे करणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा..! महाराष्ट्रात कल्याण येथे काल रात्री झालेली घटना म्हणजे राजकीय गुंडगिरीचा कळस आहे. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत आणि वैचारिक वारसा जपणारे राज्य असले तरी या सत्ताधाऱ्यांच्या कृपेने सत्तेतला आमदारच, एका माजी नगरसेवकावर बंदुकीने गोळ्या झाडण्याचा प्रकार घडला. कोणाचे तरी भक्कम पाठबळ असल्याशिवाय एक आमदार अशी हिम्मत करूच शकत नाही. चोर तो चोर वर मुजोर म्हणत मला केलेल्या गुन्ह्याचा कोणताही पश्चाताप नाही असे वक्तव्य या आमदाराकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. ही राजकीय गुंडगिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही.. असा इशारा देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिला.
कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात?
गणपत गायकवाड नक्की कोणत्या व्यवहाराला घेऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप करत आहेत?
या वक्तव्यांमागे महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं… pic.twitter.com/nM6EymdVps
— NCP (@NCPspeaks) February 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा.“राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”, आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली..!
हेही वाचा…भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, शरद पवार म्हणाले..
हेही वाचा…“राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर..”प्रकाश आंबेडकरांची गोळीबार प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“पोलिसांसमोरच गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे”, सुप्रिया सुळेंची मागणी
हेही वाचा..“सहा गोळ्या झाडल्या, मग थेट महेश गायकवाडांच्या उरावर बसले”, घटनेचा धक्कादायक सीसीटिव्ही व्हिडीओ समोर