मुंबई : सध्या ज्यांच्या हातात राज्याची सुत्र आहेत. त्यांच्याकडून कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक आहे, असे जे ऐकायला मिळते ते वास्तव आहे असे गोळीबाराच्या घटनेवरून दिसते. अशा प्रकारच्या घटना व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची बघ्याची भूमिका असेल तर आज महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालले आहे. त्याचे हे उदाहरण आहे. अशा गोष्टी घटणे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. त्यावर शरद पवारांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी….! लालकृष्ण आडवाणी यांना “भारतरत्न पुरस्कार” जाहीर, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारा हा प्रकार बघायला लागणे म्हणजे महाराष्ट्राच्या नवोदित राजकीय पिढीचे दुर्दैव म्हणावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा हा महाराष्ट्र राजकीय गुंडांचा खुला मंच बनत चालला आहे. या अमानवी प्रकारांना आळा बसलाच पाहिजे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं म्हणत मी हा मुद्दा इथे नाही दिल्ली दरबारी सोमवारी पार्लमेंट मध्ये उचलणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा….“संजय गायकवाड तुझं ‘राजकीय कवाड’ ओबीसी व मराठा मिळून बंद करतील”, अन् रूपाली पाटील संतापल्या
दरम्यान, उल्हासनगरमधील गोळीबाराची घटना अत्यंत आश्चर्यकारक व निषेधार्ह आहे. सरकार आणि गुंडांमधील अंतर कमी झालेल आहे. व गुंडागिरीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे मी नाही तर सत्तारूढ भाजपचे आमदराच सांगत आहेत. ते स्वत च सांगताहेत की मी पाच गोळ्या झाडल्या.पोलिस स्टेशनमध्येच पोलिसांच्या उपस्थितीत असा गोळीबार होणे म्हणजे कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगण्यात आल्यासारखे महाराष्ट्राचे चित्र आहे. अशी घटना महाराष्ट्रात यापुर्वी कधीही झाली नव्हती ती आज झालेली आहे. याचा निषेध करावा तितका कमी आहे. असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर..”प्रकाश आंबेडकरांची गोळीबार प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“पोलिसांसमोरच गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे”, सुप्रिया सुळेंची मागणी
हेही वाचा..“सहा गोळ्या झाडल्या, मग थेट महेश गायकवाडांच्या उरावर बसले”, घटनेचा धक्कादायक सीसीटिव्ही व्हिडीओ समोर
हेही वाचा..“लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार”,एकनाथ शिंदे म्हणाले.. की
हेही वाचा…“भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”