बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेलं विधान मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. निवडणुकीच्या वेळी कुणी येतील, भावनिक साद घालतील, शेवटी निवडणुक सांगतील. परंतु तुम्ही अजित पवारच उमेदवार आहे असं समजून मतदान करा, असं अजित पवारांनी सांगितले. त्यावरून शरद पवार गटातील आमदारांनी अजित पवारांवर जोरदार टिका केली. तर यातच आता शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“त्यामुळे गणपत गायकवाड अन् महेश गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये गेले”, अन्….
बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार त्यांच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीला तिकीट देतील आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीत उभं करतील. अजित पवार यांनी काल जे भाषण केले. त्या भाषणामध्ये त्यांच्यातला अंहकार दिसत होता. त्यामुळे सत्तेमध्ये राहून अजित पवार हे स्वत: कुटुंबातील व्यक्तीला निवडून आणतील, मात्र, आम्ही लोकांना विश्वासात घेऊन या बलाढ्य शक्तीसोबत लढत राहू, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. बीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कंकालेश्वर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी रोहित पवार बोलत होते.
हेही वाचा…ठरलं तर, तोफ धडाडणार..! वळसे पाटलांच्या होमपिचवर शरद पवारांची सभा, कोल्हेंना मिळणार मोठी ताकद
अजित पवारांच्या टिकेनंतर जितेंद्र आव्हाड संतापले. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे, याचना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे काय याचा विचार अजित पवार यांनी जरूर करावा. काय माहित शेवटची निवडणूक कधी असेल ? शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचं योगदान असणार आहे हे विसरू नका. आज अजित पवारांनी सगळी हद्दच ओलांडली असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना चांगलाचं फटकारलं. तसेच ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले. ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असलं घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही. असेही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार असे अजित पवार यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. यातच मागील काही दिवसापासून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुमेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची खात्रीशीर सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे बारामतीची निवडणुक खुपच रंगतदार होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींच्या फोटोला काळं फासणं पडलं महागात, कॉंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊतांना अटक
हेही वाचा…“शरद पवारांवरील टिका अजित पवारांना भोवली,” टिका झाल्यानंतर दिलं मोठं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडून गुंडाची पक्षात भरती,” विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचा….“तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही…,” शरद पवारांवर टिका, अजित पवारांना शरद पवार गटाने सुनावलं
हेही वाचा…“आमच्या फंदात न पडता स्वतःच्या ढोंगी हिंदुत्वाकडे लक्ष द्या”, ठाकरे गटाचा भाजपवर जोरदार पलटवार