मुंबई : कुणी येतील अन् भावनिक साद घालतील, ही शेवटची निवडणुक असल्याचं सांगतिल. मात्र तुम्ही अजित पवार उभा आहे हे समजून मतदान करा. शेवटची निवडणुक सांगतील. कधी निवडणुक आहे माहित नाही. असे विधान अजित पवारांनी बारामतीत केले. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाने अजित पवारांवर जोरदार टिका केली. यातच आता यावर अजित पवार यांनी आपलं स्पष्टिकरण दिलं आहे. त्यावर परत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडून गुंडाची पक्षात भरती,” विरोधकांचा हल्लाबोल
काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे. असं म्हणत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा….“तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही…,” शरद पवारांवर टिका, अजित पवारांना शरद पवार गटाने सुनावलं
दरम्यान, आता अजित पवार यांच्या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला ? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले. जाऊ द्या. कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती. आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते. असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.
नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात.
साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा
तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले
जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच
नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती
आणि हो… https://t.co/jdukapOz5L— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकाही लागू शकतात, फक्त एक महिना बाकी “
हेही वाचा…पियुष गोयल यांच्यासाठी मुंबईतील ‘हा’ लोकसभा मतदारसंघ ठरला, सर्वाधिक मताधिक्क्यांनी विजयी होणाऱ्या खासदाराचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा…सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, राष्ट्रवादीत संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हे
हेही वाचा…मोदींच्या फोटोला काळं फासणं पडलं महागात, कॉंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊतांना अटक
हेही वाचा…“शरद पवारांवरील टिका अजित पवारांना भोवली,” टिका झाल्यानंतर दिलं मोठं स्पष्टीकरण, म्हणाले…