मुंबई : राज्यसभेतील नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगून राज्यसभेत नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची अशी भाजपची योजना असल्याची मााहिती समोर येत आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पियुष गोयल यांना मुंबईतून लोकसभा निवडणुक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पियुष गोयल यांच्यासाठी कोणता मतदारसंघ योग्य आणि सुरक्षित ठरेल याची सध्या भाजपकडून चाचपणी सुरू आहे. यामुळे भाजपच्या विद्यमान खासदारांना मोठी भीती निर्माण झाली आहे. कारण पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर विद्यमान खासदाराचा पत्ता कट होणार आहे.
हेही वाचा…“आमच्या फंदात न पडता स्वतःच्या ढोंगी हिंदुत्वाकडे लक्ष द्या”, ठाकरे गटाचा भाजपवर जोरदार पलटवार
पियुष गोयल मागील २०१० पासून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना मध्य उत्तर मुंबई किंवा उत्तर मुंबई या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची सांगण्यात येत आहे. विद्यमान खासदार पुनम महाजन या उत्तर मुंबईतून तर गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार आहेत. या दोघांपैकी एकाच तिकिट कापलं जाईल अन् त्यासाठी पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा…“त्यामुळे गणपत गायकवाड अन् महेश गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये गेले”, अन्….
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा गोपाळ शेट्टी यांनी तब्बल ४ लाख ६५ हजार मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्रात इतक्या मताधिक्क्यांन अन्य कोणत्याही उमेदवाराला विजय मिळालेला नव्हता. त्यामुळे पियुष गोयल यांना हा मतदारसंघ सुरक्षित वाटण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला पुनम महाजन या उत्तर मध्य मुंबईतून १ लाख ३० हजार मतांनी विजयी झाल्या होत्या.
दरम्यान, पियुष गोयल यांनी केंद्रात वाणिज्य, वस्त्रोद्योग, ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. गोयल यांना उत्तर मध्य मुंबईतून संधी द्यायची की सर्वात सुरक्षित असलेल्या उत्तर मुंबईतून तिकिट द्यायचा याबाबत सध्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, राष्ट्रवादीत संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हे
हेही वाचा…मोदींच्या फोटोला काळं फासणं पडलं महागात, कॉंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊतांना अटक
हेही वाचा…“शरद पवारांवरील टिका अजित पवारांना भोवली,” टिका झाल्यानंतर दिलं मोठं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडून गुंडाची पक्षात भरती,” विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचा….“तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही…,” शरद पवारांवर टिका, अजित पवारांना शरद पवार गटाने सुनावलं