मुंबई : राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन कामासाठी देण्यात येणाऱ्या मोबाईल खरेदीमध्ये देखील कोट्यवधींचा घोटाळा महायुती सरकारने केला असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महायुती सरकारमध्ये दोन आलिबाबा आणि ८० चोरांची पैसे खाण्याची भूक प्रंचड वाढल्याची टिका देखील वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
हेही वाचा…“लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकाही लागू शकतात, फक्त एक महिना बाकी “
राज्यात आठ हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा गाजत असताना सरकारने आता नवीन मोबाईल घोटाळा केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रूपयांचे मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा घोटाळा देखील 100 कोटींच्यावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…पियुष गोयल यांच्यासाठी मुंबईतील ‘हा’ लोकसभा मतदारसंघ ठरला, सर्वाधिक मताधिक्क्यांनी विजयी होणाऱ्या खासदाराचा पत्ता कट होणार ?
तर महायुती सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि 80 चोर आहेत ज्यांची पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली आहे. लोकसभा आचारसंहिते अगोदर सरकारी तिजोरी लूटून आपली तिजोरी भरून घेण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जात आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या महायुती सरकारचे ब्रिद आहे. असा घणाघात देखी वडेट्टीवारांनी सरकारवर चढवला.
हेही वाचा…सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, राष्ट्रवादीत संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हे
दरम्यान, या दोन्ही घोटाळ्यातील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे. मोबाईल द्यायचा असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. अंगणवाडी सेविकांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी. मग भ्रष्टाचार होणार नाही. अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का? असा सवालही त्यांनी केला.
महायुतीचा 155 कोटींचा मोबाईल घोटाळा.
महायुती सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि 80 चोर आहेत ज्यांची पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली आहे. लोकसभा आचारसंहिते अगोदर सरकारी तिजोरी लूटून आपली तिजोरी भरून घेण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जात आहे.
सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या महायुती…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी मनसेचा पुढचा उमेदवार कोण ?” शर्मिला ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत
हेही वाचा…मोठी बातमी….! कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अजित पवारांची आख्खी फॅमिली लागली कामाला
हेही वाचा…“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल..,” वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“इच्छूक उमेदवारांचा पुण्यात अध्यात्मिक कार्यक्रमांवर भर”, पुणे लोकसभेसाठी स्पर्धा वाढली
हेही वाचा…“नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात”, अजित पवार अन् आव्हाडांमध्ये वाकृयुद्ध