मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात २६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिसूचना जारी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दलची भूमिका घेतली. त्या अधिसूचनेवर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी प्रवर्गातून आक्षेप घेतला जात आहे. जारी केलेल्या अधिसूचनेतील मसुद्याला आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील ओबीसी सेलने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे राज्य प्रमुख राज राजापुरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आज राज्य सरकारने काढलेल्या मराठा समाजाच्या अधिसुचनेतील मसुद्याला विरोध दर्शविला.
हेही वाचा…“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल..,” वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
आमचा विरोध मसुद्याला आणि त्यात वापरलेल्या शब्द प्रयोगाला आहे. मसुदा हा नियमबाह्य आणि घटनाबाह्य असून यात ज्या शब्दाचा विरोध केला असून तो म्हणजे ‘सगेसोयरे’. शासनाने घेतलेला हा निर्णय कायद्याच्या कसोटीत बसणारा नाही आहे. सगेसोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे, परंतू प्रस्ताविक मसुद्यातील निकषांनुसार जवळपास ८०% मराठा समाज हा ओबीसीमध्ये समाविष्ट होऊन मूळ ओबीसी घटक हा आपल्या हक्कापासून वंचित आहे. असे राज राजापुरकर यांनी सांगितले.
हेही वाचा…“इच्छूक उमेदवारांचा पुण्यात अध्यात्मिक कार्यक्रमांवर भर”, पुणे लोकसभेसाठी स्पर्धा वाढली
जातीनिहाय जनगणना जोपर्यंत संपूर्ण राज्यात होणार नाही, तोपर्यंत कोणत्याच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. शासनाकडून सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावून समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारला राज्याची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यास काय अडचण आहे? असा सवालही त्यांनी विचारला. तसेच आमचा विरोध हा मराठा समाजाच्या आरक्षणाला बिलकूल नाही. असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलची खंबीर भूमिका आहे की, मराठा समाजाला आरक्षण हे मिळायलाच हवे. एखादा समाज जर मागासलेला असेल तर त्याला आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आम्ही हरकती नोंदवायला सुरुवात केलेली आहे आणि या हरकती तहसील कार्यालयात जातील. असेही ते म्हणाले. जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असा इशारा देखील त्यांनी दिला.
READ ALSO :
हेही वाचा…“जमीन विकून आलेला पैसा अन् पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही”
हेही वाचा…बाळा नांदगावकरांनी भेट म्हणून राज ठाकरेंना दिली ‘बाबरी मशिदीची वीट’, राज ठाकरे म्हणाले…
हेही वाचा…“पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली, महायुतीचा 155 कोटींचा मोबाईल घोटाळा”
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी मनसेचा पुढचा उमेदवार कोण ?” शर्मिला ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत
हेही वाचा…मोठी बातमी….! कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अजित पवारांची आख्खी फॅमिली लागली कामाला