पुणे : केंद्रीय निवडणुक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुका जाहिर केल्या आहेत. राज्यसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच संपुर्ण देशात लोकसभा निवडणुका लागणार आहे. याची राज्यात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मनसेने देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच पुण्याचा पुढचा उमेदवार कोण असणार ? याबाबत आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी मनसेचा पुढचा उमेदवार कोण ?” शर्मिला ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत
मार्च-एप्रिलला लोकसभा होतील. ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होणार आहेत. तसेच पुढच्या वर्षी महापालिका निवडणुका होतील. मनसेने पुण्यात चांगले काम केले आहे. कोविड कोळात सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते. तेव्हा मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते. असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा…मोठी बातमी….! कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अजित पवारांची आख्खी फॅमिली लागली कामाला
तर पुणे लोकसभेसाठी मनसेचा उमेदवार कोण असणार ? यावर बोलतांनी त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. त्या म्हणाल्या की, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडले. असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. त्यामुळे पुणे लोकसभेसाठी मनसेकडून साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा सुरू झाली. तर अलिकडेच वंसत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. तसेच मोरे यांनी तशी इच्छा देखील व्यक्त करून दाखवली.
READ ALSO :
हेही वाचा…*“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, आयत्या प्रकल्पांवर उबाठा,” भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटवॉर*
हेही वाचा…“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेला शरद पवार गटाचा विरोध”, म्हणाले….
हेही वाचा…“जमीन विकून आलेला पैसा अन् पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही”
हेही वाचा…बाळा नांदगावकरांनी भेट म्हणून राज ठाकरेंना दिली ‘बाबरी मशिदीची वीट’, राज ठाकरे म्हणाले…
हेही वाचा…“पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली, महायुतीचा 155 कोटींचा मोबाईल घोटाळा”