मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी असा दोन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेऊन भाजप आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. त्यानंतर दौरा आटोपून उद्धव ठाकरे यांनी सिंधूदुर्ग ते मुंबई असा वंदे भारतमधून प्रवास केला. त्यावर आता भाजपकडून खोचक टिप्पणी केली असून त्यावर आता ठाकरे गटाकडूनही पलटवार केला जात आहे.
हेही वाचा…मोठी बातमी….! कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अजित पवारांची आख्खी फॅमिली लागली कामाला
भाजपने उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे यांचा वंदे भारत ट्रेनमधला फोटो ट्विट केला. त्यावर मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी असं म्हणत वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार मोदी सरकार असं म्हणत भाजपने ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर कोस्टल रोड, MTHL ही ठाकरेंची गॅरेंटी होती, पण क्रेडीट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटनाची घाई होतेय. MTHL अनेक महिने तयार असूनही उद्धाटनाला विलंब केला आणि आता कोस्टल रोड तयार नसूनही उद्धाटनाची घाई चाललीये. पण तुम्ही कितीही घाई केलीत. तरी मुंबईचे हाल करणाऱ्या खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडीट मिळणार नाहीच. असा पलटवार ठाकरे गटाकडून करण्यात आला.
हेही वाचा…“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल..,” वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, ठाकरे गटाने केलेल्या टिकेला पुन्हा भाजपकडून टिकास्त्र सोडण्यात आले. आयत्या प्रकल्पांवर उबाठा घरात बसून बाबरी ढाच्या उध्वस्त केल्याचे श्रेय लाटल्या नंतर प्रस्तुत आहे “MTHL अटल सेतू” आणि कोस्टल रोड. तुम्ही फक्तं आम्ही केलेल्या कामांची श्रेय लाटू शकता तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री १ ते मातोश्री २ या पलीकडे नाही हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. असं भाजपने सांगितले.
आयत्या प्रकल्पांवर उबाठा
घरात बसून बाबरी ढाच्या उध्वस्त केल्याचे श्रेय लाटल्या नंतर प्रस्तुत आहे “MTHL अटल सेतू” आणि कोस्टल रोड.
तुम्ही फक्तं आम्ही केलेल्या कामांची श्रेय लाटू शकता तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री १ ते मातोश्री २ या पलीकडे नाही हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.… https://t.co/cOg0zFeUD9
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेला शरद पवार गटाचा विरोध”, म्हणाले….
हेही वाचा…“जमीन विकून आलेला पैसा अन् पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही”
हेही वाचा…बाळा नांदगावकरांनी भेट म्हणून राज ठाकरेंना दिली ‘बाबरी मशिदीची वीट’, राज ठाकरे म्हणाले…
हेही वाचा…“पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली, महायुतीचा 155 कोटींचा मोबाईल घोटाळा”
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी मनसेचा पुढचा उमेदवार कोण ?” शर्मिला ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत