मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचा महत्वाचा निर्णय काल निवडणुक आयोगाने दिला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीआधीच शरद पवार गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह हे देखील निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा…“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेला शरद पवार गटाचा विरोध”, म्हणाले….
राष्ट्रवादी कुणाची यासंदर्भात निवडणुक आयोगात दोन्ही गटाने याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर काल निवडणुक आयोगाने निकाल दिला. यामध्ये पक्षाच्या घटनेतील उदिष्टांची केलेली तपासणी, पक्षाची घटना, पक्षामध्ये संघटना तसेच विधिमंडळ पक्षपातळीवर नक्की कोणत्या गटाकडे बहुमत आहे. याची तपासणी केल्याचे आयोगाने निकालात म्हटले आहे. या निकालाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका आता शरद पवार गटाने घेतली आहे.
दरम्यान, पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस, ५ आमदार व एका खासदाराने दोन्ही बाजूंनी पत्र दिले आहे. तसेच सध्या अजित पवार गटाकडे महाराष्ट्रातील ४१ नागालॅंचे सात तर झारखंडच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. यातच लोकसभेचे २ खासदार, विधान परिषदेतील ५ आमदार आणि राज्यसभेचा एक खासदार अस संख्याबळ असून शरद पवार गटाकडे महाराष्ट्रातील १५ आमदार, केरळमधील १ आमदार, लोकसभेचे ४ खासदार, विधान परिषदेचे ४ आमदार आणि राज्यसभेचे ३ खासदारांचा पाठिंबा आहे.
हेही वाचा…“जमीन विकून आलेला पैसा अन् पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही”
यातच आपल्या राजकीय गटाला कोणते नाव व चिन्हे द्यावे, यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुभा निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला दिली आहे. बुधवारी दुपारपर्यंत शरद पवार गटाने तीन नावांचे पर्याय सादर करावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत. तसेच आता निवडणुक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे, तसेच नव्या पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणे असे पर्याय आता शरद पवार गटाकडे उरले आहेत. त्यामुळे राज्यातील आगामी काळात कशा पद्धतीने राजकीय घडामोडी घडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरलं
हेही वाचा…“काकाचा पक्ष पुतण्याच्या ताब्यात,” राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांना, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
हेही वाचाजरांगे पाटलांचा १० फेब्रुवारीपासून पुन्हा एल्गार..! सरकारला दिला पुन्हा हा इशारा
हेही वाचा…दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, शर्मिला ठाकरेंकडून लोकसभेचे संकेत
हेही वाचा…*“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, आयत्या प्रकल्पांवर उबाठा,” भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटवॉर*