मुंबई : शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांना देखील असेच केले. आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मराठी माणसाचा पक्ष, त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात आणि शरद पवार साहेबांच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्तीचे निर्णय घेत असते. त्याचे आणखी एक उदाहरण. आमदारांच्या आकड्यावरून पक्ष हा ठरत नसतो. पक्ष ही संघटना ठरवत असते. त्यामुळे अर्थात संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. त्यामुळे या ऑर्डरच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. काल निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आले. त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, शर्मिला ठाकरेंकडून लोकसभेचे संकेत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्या हातातून पक्ष काढून घेणे हे इतिहासात पहिल्यांदाच घडलेले आहे. परंतु यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही कारण हे अपेक्षित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबासोबत जे झाले, तेच षडयंत्र शरद पवार साहेबांच्या कुटुंबासोबत होत असल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितले. तसेच आमच्या केसमध्ये घटनेप्रमाणे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. या सर्व गोष्टी अदृश्य शक्तीमुळे झालेल्या आहेत. असंही त्या म्हणाल्या.शुन्यातून पक्ष उभा केला, शुन्यातून राजकीय परिस्थिती निर्माण केली, त्यांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते. आदरणीय पवार साहेबांनी त्यांचे सगळे राजकीय आयुष्य हे शुन्यातून उभे केलेले आहे. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, आयत्या प्रकल्पांवर उबाठा,” भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटवॉर
दरम्यान, राष्ट्रवादी कुणाची यासंदर्भात निवडणुक आयोगात दोन्ही गटाने याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर काल निवडणुक आयोगाने निकाल दिला. यामध्ये पक्षाच्या घटनेतील उदिष्टांची केलेली तपासणी, पक्षाची घटना, पक्षामध्ये संघटना तसेच विधिमंडळ पक्षपातळीवर नक्की कोणत्या गटाकडे बहुमत आहे. याची तपासणी केल्याचे आयोगाने निकालात म्हटले आहे. या निकालाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका आता शरद पवार गटाने घेतली आहे.
दरम्यान, पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस, ५ आमदार व एका खासदाराने दोन्ही बाजूंनी पत्र दिले आहे. तसेच सध्या अजित पवार गटाकडे महाराष्ट्रातील ४१ नागालॅंचे सात तर झारखंडच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. यातच लोकसभेचे २ खासदार, विधान परिषदेतील ५ आमदार आणि राज्यसभेचा एक खासदार अस संख्याबळ असून शरद पवार गटाकडे महाराष्ट्रातील १५ आमदार, केरळमधील १ आमदार, लोकसभेचे ४ खासदार, विधान परिषदेचे ४ आमदार आणि राज्यसभेचे ३ खासदारांचा पाठिंबा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जखमी वाघ अधिक धोकादायक असतो”, रोहित पवारांनी राष्ट्रवादीची तुलना केली महाभारताशी!
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेलं, शरद पवारांची पुढची भूमिका काय ?
हेही वाचा…मोठी बातमी…! शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरलं
हेही वाचा…“काकाचा पक्ष पुतण्याच्या ताब्यात,” राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांना, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
हेही वाचाजरांगे पाटलांचा १० फेब्रुवारीपासून पुन्हा एल्गार..! सरकारला दिला पुन्हा हा इशारा