मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचा महत्वाचा निर्णय काल निवडणुक आयोगाने दिला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीआधीच शरद पवार गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह हे देखील निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांचा १० फेब्रुवारीपासून पुन्हा एल्गार..! सरकारला दिला पुन्हा हा इशारा
आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकात आहोत. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित वपार यांनी एक्सवर पोस्ट करून ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी एक्सवर पोस्टमध्ये स्वत: ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहिर केलं आहे. तर निवडणुक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित आहे. या निर्णयाने लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे. अजितदादा पवार आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा…दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, शर्मिला ठाकरेंकडून लोकसभेचे संकेत
दरम्यान, शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांना देखील असेच केले. आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मराठी माणसाचा पक्ष, त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात आणि शरद पवार साहेबांच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्तीचे निर्णय घेत असते. त्याचे आणखी एक उदाहरण. आमदारांच्या आकड्यावरून पक्ष हा ठरत नसतो. पक्ष ही संघटना ठरवत असते. त्यामुळे अर्थात संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. त्यामुळे या ऑर्डरच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. काल निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आले. त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!
श्री. अजित पवार,
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष@AjitPawarSpeaks— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते, तेव्हा…,” सुप्रिया सुळे राष्ट्रवादी निकालाच्या विरोधात कडाडल्या
हेही वाचा…“जखमी वाघ अधिक धोकादायक असतो”, रोहित पवारांनी राष्ट्रवादीची तुलना केली महाभारताशी!
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेलं, शरद पवारांची पुढची भूमिका काय ?
हेही वाचा…मोठी बातमी…! शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरलं
हेही वाचा…“काकाचा पक्ष पुतण्याच्या ताब्यात,” राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांना, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय