मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षनाव आणि घड्याळ चिन्ह निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून या निकालाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. तर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यातच आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देखील काही दिवसांनी लागणार आहे. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठ भाष्य केलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेलं, शरद पवारांची पुढची भूमिका काय ?
राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येत्या १४ फेब्रवारी रोजी लागण्याची शक्यता आहे. त्यावर राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी मेरीट नुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागण्यात आलेली नाहीत. अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरलं
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर दोन्ही गटाने निवडणुक आयोगात धाव घेतली होती. त्यानंतर दोन्ही गटाला कागदपत्रे जमा सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काल निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्हांबाबत अजित पवार गटाकडून निर्णय दिला आहे. तर राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर दोन्ही गटाचा युक्तिवाद पार पडला आहे. त्यानुसार याचा निकाल आता १४ फेब्रुवारीला लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटली, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ वाढला, असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल
हेही वाचा…वाह रे पठ्या..! मनसेने राष्ट्रवादीच्या प्रकरणात दारूगोळा भरला, अजित पवारांवर चढवला हल्ला
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, “स्वत: ला राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून उल्लेख करत..,”
हेही वाचा…“शरद पवारांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते, तेव्हा…,” सुप्रिया सुळे राष्ट्रवादी निकालाच्या विरोधात कडाडल्या
हेही वाचा…“जखमी वाघ अधिक धोकादायक असतो”, रोहित पवारांनी राष्ट्रवादीची तुलना केली महाभारताशी!