मुंबई : शिवसेनाप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह देखील निवडणुक आयोगाने महायुतीत असलेल्या अजित पवारांना दिले. त्यावरून राज्यातील विरोधकांनी भाजपसह सरकारवर जोरदार टिका केली. निकालाच्या विरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या भूमिकेत आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात येण्याचा ओघ आता वाढल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरलं
मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी राज्य ग्रंथालय महासंघाचे बी.जी. देशमुख यांच्यासह त्यांच्या संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना शिंदे गट सचिव संजय मोरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा…“काकाचा पक्ष पुतण्याच्या ताब्यात,” राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांना, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
दरम्यान, राज्यातील महायुती सरकारने केलेल्या लोकाभिमुख कामांवर विश्वास ठेवूनच आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या ५३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहराचे सुशोभीकरण, संपूर्ण स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम राबवण्यात येत असून हे शहर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर ठरावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी राज्य ग्रंथालय महासंघाचे… pic.twitter.com/XiJfyCruwP
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा…वाह रे पठ्या..! मनसेने राष्ट्रवादीच्या प्रकरणात दारूगोळा भरला, अजित पवारांवर चढवला हल्ला
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, “स्वत: ला राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून उल्लेख करत..,”
हेही वाचा…“शरद पवारांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते, तेव्हा…,” सुप्रिया सुळे राष्ट्रवादी निकालाच्या विरोधात कडाडल्या
हेही वाचा…“जखमी वाघ अधिक धोकादायक असतो”, रोहित पवारांनी राष्ट्रवादीची तुलना केली महाभारताशी!
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेलं, शरद पवारांची पुढची भूमिका काय ?