मुंबई : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हांबाबत निवडणुक आयोगाचा निकाल म्हणजे अदृश्य शक्तींचे यश आहे. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. शरद पवार हेच आमचे चिन्ह आहेत, असे सांगतानाच पवारांच्या नेतृत्वात पक्ष पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. तर या निकालाच्या मागे असणारी अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे ? याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
हेही वाचा…वाह रे पठ्या..! मनसेने राष्ट्रवादीच्या प्रकरणात दारूगोळा भरला, अजित पवारांवर चढवला हल्ला
केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अदृश्य शक्तीचा उल्लेख करण्यात येत आहे. ही अदृश्य शक्ती विरोधकांना भारी पडत असून यावरून जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. तर सुरूवातीला शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आमच्या पाठीमागे अदृश्य शक्तींचा हात असल्याचे विधान केले होते. त्यानंतरच्या कित्येक भाषणात शिंदेंनी अदृश्य शक्तीचा उल्लेख केला. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडूनही याचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे.
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, “स्वत: ला राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून उल्लेख करत..,”
दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवल्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा दणदणीत विजय मिळवला. यादरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचा सातत्याने गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर आरोप केला. तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला. यातच आता अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे ? असा सवाल अनेकांना पडला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली!
हेही वाचा…“तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवू,” महेश लांडगे यांनी दिली इशारा, प्रकरण काय ?
हेही वाचा…“जेव्हा घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की…”, जंयत पाटील असे काय बोलून गेले ?
हेही वाचामोठी बातमी…! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत नार्वेकरांचा मोठा दावा, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटली, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ वाढला, असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल