मुंबई : शिवसेनाप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह देखील निवडणुक आयोगाने महायुतीत असलेल्या अजित पवारांना दिले. त्यावरून राज्यातील विरोधकांनी भाजपसह सरकारवर जोरदार टिका केली. निकालाच्या विरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या भूमिकेत आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात येण्याचा ओघ आता वाढल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…“जेव्हा घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की…”, जंयत पाटील असे काय बोलून गेले ?
मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी राज्य ग्रंथालय महासंघाचे बी.जी. देशमुख यांच्यासह त्यांच्या संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना शिंदे गट सचिव संजय मोरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा…मोठी बातमी…! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत नार्वेकरांचा मोठा दावा, म्हणाले…
तर दुसऱ्या बाजूला आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भिवंडी येथील भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख दशरथ पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. याआधी दिवा भाजपच्या माजी महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
हेही वाचा.“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली!
हेही वाचा…“तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवू,” महेश लांडगे यांनी दिली इशारा, प्रकरण काय ?