मुंबई : केंद्रीय निवडणुक आयोगाने येत्या २७ फेब्रवारी रोजी राज्यसभेची निवडणुक जाहीर केली आहे. राज्यात एकूण सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणुक होत आहे. यातच पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुक होत असल्याने या निवडणुकीकडे आता सगळ्याचंच लक्ष लागून आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा करून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी वरिष्ठ पातळीवर पाठवली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा….“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा
भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, व्ही. व्ही मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकरांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यांच्या जागी भाजपच्या डझन भर नेत्यांची नावे आता वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,माजी मंत्री पंकजा मुंडे अमरीश पटेल आदी नावे चर्चेत आली आहेत. यातच मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबईचे संजय उपाध्यय ही नावेदेखील चर्चेत आली आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?
तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे नाव राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी सातत्याने चर्चेत असते. मात्र त्यांना अद्यापही संधी मिळालेली नाही. तसेच अलिकडचे पंकजा मुंडे यांचेनावही दरवेळी चर्चेत राहिले असले तरी त्यांना देखील संधी मिळालेली नाही. तर नांदेडचे डॉ. अजित गोपचडे यांना मागे विधान परिषदेवर पाठविण्याचे नक्की झाले होते. पण ऐनवेळी त्यांचे नाव वगळले होते.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप सहा जागांपैकी तीन जागा लढवेल, एक जागा शिवसेना, एक जागा राष्ट्रवादीला दिली जाईल, तर भाजप चौथी जागा लढवण्याची शक्यता जवळपास नाही. परंतु महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर आपणही चौथा उमेदवार द्यायचा असे भाजपने ठरविले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीत सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्राताई पवार? भाजपच्या हायकमांडने अजित पवारांना दिल आदेश
हेही वाचा…“शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव, निवडणुक आयोगाने ‘या’ नावावर केलं शिक्कामोर्तब”
हेही वाचाकोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा, २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारही ठरले ?
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी