मुंबई : मुंबई कॉंग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. मुंबईत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला राम राम केल्यानंतर मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी कॉंग्रेसची साथ सोडली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. गेल्या महिन्यापासून बाबा सिद्दीकी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर अखेर शिक्कामोर्तेब झाला असून कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तातडीने. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते. पण ते म्हणतात त्याप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या जातात. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो. असं म्हणत बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा देतांना म्हटले आहे. यातच आता १० फेब्रुवारी वांद्रे येथे होणाऱ्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा….“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा
बाबा सिद्दीकी हे मुंबई कॉंग्रेसचे महत्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबाा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. २०००-२००४ या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.
I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…
— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…राज्यसभेवर भाजपकडून कोण ? वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रातून पाठविली ‘ही’ डझनभर नावं
हेही वाचा…बारामतीत सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्राताई पवार? भाजपच्या हायकमांडने अजित पवारांना दिल आदेश
हेही वाचा…“शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव, निवडणुक आयोगाने ‘या’ नावावर केलं शिक्कामोर्तब”
हेही वाचाकोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा, २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारही ठरले ?
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश