नागपूर : राज्यात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याचा संघर्ष संपता संपेना नागपुरात देखील असाच काका पुतण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्यावर जोरदार टिका केली. त्यावर आता पुन्हा आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…बारामतीत सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्राताई पवार? भाजपच्या हायकमांडने अजित पवारांना दिल आदेश
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होत असलेल्या शासकीय कार्यक्रमात अनिल देशमुख- आशिष देशमुख एकमेकांत भिडले. काटोल नगरपरिषदच्या विकासकामाचे भुमीपुजन कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांनी त्यांना भाषण करण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टिका केली. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अनिल देशमुख यांना आपले भाषण थांबवावे लागले.
हेही वाचा…“शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव, निवडणुक आयोगाने ‘या’ नावावर केलं शिक्कामोर्तब”
आशिष देशमुख यांनी ते काटोलचे आमदार होते तेव्हा कसा विकास झाले हे सांगितले. आता विकास होत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला. याला अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. मी एक शब्द राजकीय बोललो नाही. मात्र, आशिष देशमुख बोलले. हा राजकीय कार्यक्रम नाही. २०१४ ला काटोलमधून निवडून आला तर मग २०१९ ला का पळून गेला असा टोला अनिल देशमुख यांनी आशिष देशमुखांना लगावला. त्यावर राज्यात सध्या पुतण्यांचे दिवस आहेत. अजित पवारांना घड्याळ मिळालं आहे. आता काका लोकांना रिटायरमेंट घेण्याचे दिवस आले आहेत. असं आशिष देशमुखांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेससोबतचा 48 वर्षाचा प्रवास संपुष्टात..! मुंबईतील कॉंग्रेसचे ‘मास लीडर’ म्हणून ओळख, कोण आहेत बाबा सिद्दीकी ?
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे उतरले मैदानात , कोकण दौऱ्यानंतर आता मुंबई अन् त्यानंतर मराठवाडा
हेही वाचा….“कार्यालयातून घड्याळ चिन्ह काढतांना पवार साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या डोळ्यात आलं पाणी”, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…कॉंग्रेसला मोठा झटका..! कॉंग्रेससोबत असलेला 48 वर्षाचा प्रवास ‘या’ नेत्याने संपवला, अजित पवार गटात करणार प्रवेश ?
हेही वाचा…राज्यसभेवर भाजपकडून कोण ? वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रातून पाठविली ‘ही’ डझनभर नावं