IMPIMP

कोणत्या मराठा नेत्यांना आरक्षण नको ते स्पष्ट सांगा ?

 

मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि राज्यात मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात ठिकठिकाणी निषेद व्यक्त करायला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ विरोधात असेलेल्या भाजपने देखील सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केल्याचे दिसून आले.

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली त्यानंतर आता लवकरच मुख्यमंत्री मराठा आरक्षणसंबंधीची पुढील दिशा जाहीर करतील असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.तसेच यासंबंधी सरकार एक घटना पीठ देखील स्थापन करणार असल्याचे चव्हाणांनी यावेळी म्हंटले.भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील नेत्यांनाच आरक्षण नको असल्याचा आरोप केलं होता त्यावर आता अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.

ज्या नेत्यांना आरक्षण नको आहे त्यांची नावे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावीत असे थेट आव्हान अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. तर ही वेळ एकमेकांवर आरोप करण्याची नसून मराठा आरक्षणासाठी मदतीसाठी एकत्र येण्याची असल्याचे देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले आहेत.

Read Also