कणकवली : राज्यांचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब यांच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील बंद असलेल्या निवासस्थानी अज्ञाताने सोडा बॉटल मारुन हल्ला चढवला आहे. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांत धाव घेतली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेला पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी दुजोरा दिला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटीलांचा शिवसेनेवर घणाघात
शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वादाची ठिणगी आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागली आहे. मंगळवारी खासदार विनायक राऊत यांच्या मालवण तालुक्यातील तळेगाव येथील निवासस्थानावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना ताजी आहे. असे असताना मंगळवारी रात्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे.
आसमान में थुंकने वालों, करारा जवाब मिलेगा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
कणकवली पोलिस हरकुळ खुर्द येथे पोहचले असून स्थानिकांनी ही माहिती फोंडाघाट पोलिसांना दिली आहे. त्यामुळे फोंडाघाट पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सध्यातरी गावात वातावरण निवळले असली तरी स्थानिकांच्या मते यामागे राजकीय हात असून या तालुक्यातील काही पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Read Also :
- दु. ४ वाजता राणेंची पत्रकार परिषद, नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा
- फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम; नाशिक पोलिसांकडून राणेंना नोटीस
- राणे प्रकरणावर शरद पवारांनी केली, मोजक्या शब्दांत उपरोधिक टीका
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…
- राणेंना जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की’, हातातले ताटही ओढले; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप