नागपूरचा रहिवासी असलेल्या समीत ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी समीर ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर ट्विटरवर गुरुवारी #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता.
दरम्यान, यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. या विषयाला अनुसरून ट्विट करताना अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंच्या जणू खिल्लीच उडवली आहे. बेबी पेंग्विन म्हणून कुणाला त्रास होत असेल तर कशाला उगाच कुणाच्या भावना दुखवता? कृपया यापुढे त्यांचा उल्लेख वाघ असा करावा (मग तरी घराबाहेर पडतील)…अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
बेबी पेंग्विन म्हणून कुणाला त्रास होत असेल तर कशाला उगाच कुणाच्या भावना दुखवता?
कृपया यापुढे त्यांचा उल्लेख वाघ असा करावा (मग तरी घराबाहेर पडतील)…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2020