मुंबई : शिवसेनेने बंडखोर 16 आमदारांच्या निलंबनाची नोटीस बजावल्यानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात 16 बंडखोर आमदारांबाबत जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यामध्ये 11 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांबाबत निलंबनाची कारवाई करता येणार नसून त्याची सुुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमी एकनाथ शिंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नाही, मला अटक करा”; ईडीचं समन्सनंतर राऊतांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने शिवसेना ही आमचीच असल्याचे पत्र राज्यपालांना देणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे 39 आमदार, प्रहारचे 2 तर 7 अपक्ष आमदार मिळून एकुण 48 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या दाव्यानंतर आता राज्यपाल सरकारला अल्पमत सिद्ध कऱण्याचे आदेश देऊ शकतात.
“बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात राऊतांच्या इशारा देणाऱ्या भाषणाच्या लिंक दिल्या”
सध्याच्या विधान सभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव असल्याने हंगामी विधानसभा अध्यक्षांची मागणी देखील एकनाश शिंदे गटाकडून केली जाऊ शकते. तर सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी ही 11 जुलै रोजीपर्यंत राखुन ठेवली आहे. यावर हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय.. असं एकनाश शिंदे यांनी ट्विट केलं आहे.
ब्रेकिंग..! बंडखोर 39 शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला
दरम्यान, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने उपाध्यक्ष महोदयांनी कशाप्रकारे तत्परतेने कार्य केले? हे सांगण्यासाठी संपूर्ण घटनाक्रम तारखेनुसार वाचून दाखविला. शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल बहुसंख्य आमदारांचा विधानसभा उपाध्यक्ष यांना पाठिंबा असल्याचे प्रथम सभापतींनी सिद्ध करावे. ज्या विधानसभा उपाध्यक्ष महोदयांकडे बहुमत आहे त्यांना फ्लोर टेस्टची भीती का वाटेल? शिंदे गटाचे वकील कौल यांच्याकडून 179 या कलमाचा उल्लेख करण्यात आला आहे. उपाध्यक्षांना हटविण्याबाबत हे कलम आहे.
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!#realshivsenawins
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
Read also:
- “आदित्य ठाकरे आता तुमच्या बुद्धीची कीव येते”; सदाभाऊ खोतांची जहरी टीका
- आता तर विठ्ठलाची महापुजा ‘उद्धव ठाकरेचं’ करणार; SC च्या निकालानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
- बंडखोर आमदारांना केंद्र अन् राज्याने सुरक्षा द्यावी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- “आम्ही संपणार नाही, थांबणार नाही, माघार घेणार नाही”; बंडखोर आमदारांची भूमिका
- राजकीय हस्तक्षेप झालेल्या मतदार याद्या बदला, अन्यथा..; विधान परिषद आमदार उमा खापरेंचा इशारा