मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील 39 शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता अल्पमतात आल्याची माहिती शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी दिली आहे. शिंदे गटातील 15 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच शिंदे गटाने संजय राऊत यांच्या भाषणाच्या लिंक देखील दिल्या आहेत.
बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटीवरून आता गोव्यात स्वारी; भाजपच्या 3 नेत्यांकडे जबाबदारी ?
एकनाथ शिंदे गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. या याचिकेत महाविकास आघाडीतून पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना पाठवलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात देखील ही याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या इशारा आणि प्रक्षोभक देणाऱ्या भाषणाच्या लिंक देखील दिल्या आहेत.
पत्रकारांना चकवा देत ‘एकनाथ शिंदे’ काल गुजरातमध्ये; फडणवीससोबत चर्चा झाल्याची माहिती
बंडखोर आमदारांनी माघारी न घेतल्य़ाने संजय राऊतांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तसेच अनेक दिवसांपासून संजय राऊत हे बंडखोर आमदारांवर जहरी टिका करताना दिसत आहे. त्यामुळेच बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या भाषणाच्या लिंक दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्याचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे आता फक्त 115 आमदारांचं बहुमत उरलेलं आहे आणि त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे, असे समजण्यास काही हरकत नाही.
देवा लवकर आटप रे हे सगळं..! हॅाटेलचे बिल वाढतेय; दिपाली सय्यदचा खोचक टोला
दरम्यान, शिंदे गटातील १५ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेच दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. एक तर आमदारांनी उपाध्यक्षांना बेकायदेशीय ठरवून आमदारांना अपात्र नोटिशीला आव्हान दिले आहे. दुसरे म्हणजे त्यांनी स्वत: ला आणि आपल्या कुटुंबाला न्यायालयाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकिल हरीश साळवे आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवदत्त कामत लढणार आहे. तर उपाध्यक्षांसाठी अधिवक्ता रविशंकर जंध्याला लढणार आहे. आमदारांच्या वतीने दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहे.
Read also:
- ब्रेकिंग..! बंडखोर 39 शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला
- बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला लावून बसताना याचना होत नाहीत का?
- शिंदे गटाच्या वकिलाची फी एका दिवसाची तब्बल ३० लाख; ठाकरे अन् शिंदे गटाची न्यायालयात सुनावणी
- “राणा बाई थोडी कळ काढा, हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील”
- काय ती झाडी, काय तो डोंगर, म्हणणाऱ्या बंडखोर आमदाराला राऊतांनी फटकारलं