मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाली आहे. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांचे कार्यालय फोडण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील इशारा दिला आहे. शिंदे साहेबांमुळे शातं आहोत नाहीतर असं त्यांनी म्हटलं आहे. अशातच आता शिवसेनच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे.
सेनेच्या ‘या’ 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस; विधानसभा उपाध्यक्षांनी सोमवारपर्यंत दिला वेळ
दिपाली सय्यद यांनी यात म्हटलं आहे की, देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढतोय, विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा! असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी; नवनीत राणांची अमित शहांकडे मागणी
शालीनी बाई झटक्याचे नाव म्हणजे ब्रिजभूषण हे विसरू नका मताधिक्याची गोष्ट करू नका, उरलेला शिलेदार शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहे आणि सरकार शिवसेनेचे असणार आहे,उगाच कळ काढु नका तुमचे मामु बरे होण्याआगोदरच पक्ष सपाट होईल तुमचा. तुमची मत किती तुम्ही बोलता किती? असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू. अंसही ते म्हणाले.
शिवसेना कार्यकारणीत 4 ठराव मंजूर; बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरेंचा आता एल्गार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जे केलं ते कसं बरोबर आहे ते दाखवण्यासाठी लोकांनी त्यांना समर्थन दिलं. शिवसेनेचा भगवा अजूनही डौलाने फडकतो आहे. शिंदे साहेब आजही सांगताहेत की आजही ते शिवसेनेतच आहे. शिंदे साहेबांसोबत चाळीस शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष आमदार आहेत. अडीच वर्ष अनैसर्गिक आघाडी झाली, त्यातून बाहेर पडलं पाहिजे कार्यकर्त्यांची आज एकच तक्रार आहे. सत्ता आल्यावर त्यांचा विकास होईल. असे त्यांना वाटत होते. मात्र त्यांची कामं झाली नाहीत. असं एकनाथ शिंदे यांचा सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थानात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढतोय, विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा! @mieknathshinde
— Deepali Sayed (@deepalisayed) June 25, 2022
Read also:
- “अजित दादांनी शिवसेनेचा निधी थांबवण्याचं काम केलं”;श्रीकांत शिंदेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- लक्षात ठेवा..! शिंदे साहेबांमुळे शांत बसलो आहे; ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
- “राष्ट्रवादी- काॅंग्रेसकडून शिवसेना हायजॅक, आम्ही अजूनही शिवसेनेतच”; बंडखोर आमदार दिपक केसरकर
- “गद्दारांना शिवसेनेत पुन्हा जागा नाही, शिवसेना निखार, पाय ठेवाल तर जळाल”
- हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल