मुंबई : शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे यांच्यावर घरावर उद्धव ठाकरे गुंड पाठवत आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून राणा दाम्पत्य आणि शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. अशातच त्यांनी आता राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गायब सचिन जोशी कोण, त्यांचा बंडांशी काय संबंध? व्हायरल झालेल्या फोटोमुळे खळबळ
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. असा आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचे आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.
“बापाला धमकी देण्याचं काम राणेंसारख्या बेडकांनी करू नये”; रूपाली पाटलांचा राणेंना इशारा
शिवसेनेतील तब्बल 37 आमदार एकनाथ शिंदे गटात सध्या सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडील गटनेता पद देखील काढून घेण्यात आलं. तसेच शिवसेना भवानात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचं मंत्रीपद, तसेच गटनेता पद आणि इतर मंत्र्यांचं पद देखील काढून घेण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या मुलांकडील शिवसेनेतील युवा अध्यक्षांचा देखील कारभार काढून घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बंडखोर एकनाथांकडे ‘इतकी’ आहे संपत्ती: 7 महागड्या गाड्या, 9 कोटींची घरं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तुल
दरम्यान, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या कडून देखील शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता मोठा पेच निर्माण झाला आहे. तसेच शिवसेनेतील तब्बल 37 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे
Read also:
- शिवसेना कार्यकारणीत 4 ठराव मंजूर; बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरेंचा आता एल्गार
- बंडखोर आमदारांवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला जातोय ‘इतका’ खर्च; सात दिवसांसाठी 70 रूम बुक
- ठरलं…! एकनाथ शिंदेंच्या गटात नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ ठेवण्यात आलं
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”