मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामागे हा भाजपचाच डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे शिवसेनेविरोधात बंड का करू शकतात? या अनेकांचा विश्वास बसत नाही. राज्याच्या कानोकोपऱ्यात अशीच चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे इडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजप काम करत असल्याचा आरोपही केला जात आहे.
निलंबित करण्याचं पत्र देताच शिंदे गटातील आमदारांनी गाठलं थेट विधानभवन
सचीन जोशी कुठे आहे? त्यांचा एकनाथ शिंदे यांच्याशी काय संबंध आहे?अशा प्रकराची एक पेपर कटिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे त्यांचे सचिव सचिन जोशी यांना दहा दिवसांपुर्वी ईडीची नोटीस आली होती. ही नोटीस आल्यापासून ते ठाण्यातील गायब आहेत. सचिन जोशी कुठे आहेत? आणि त्यांना बजावलेल्या ईडीच्या नोटिशींच्या एकनाथ शिंदेंच्या आर्थिक बंडाशी काय संबंध आहे. अशी चर्चा सध्या रंगली आहे. असंही त्यात म्हटलं आहे.
“बंडखोरीमागे भाजपचाच हात, त्यांची आग्राहुन सुटका करावीच लागेल”; ठाकरेंचा आता भाजपवर हल्लाबोल
मुळात सचिन जोशी हे ठाण्यातीलच आहेत. ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. एकनाथ शिंदेंचे आर्थिक व्यवहार हे सचिन जोशी हाताळ होते. असं सांगितलं जातं. पण अधिकृतपणे त्यावर अद्याप कुणीच वाच्यता केलेली नही. सचिन जोशींसह ठाण्यात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाकडून शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळले जातात. असं बोलंलं जातंय.
ठाकरे अन् शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा; बंडखोर आमदारांना ठाकरेंचं आवाहन
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या कुटुंबियाची सुरक्षितता राज्य सरकारकडून काढून घेण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. असंही ते म्हणाले.
Read also:
- “बापाला धमकी देण्याचं काम राणेंसारख्या बेडकांनी करू नये”; रूपाली पाटलांचा राणेंना इशारा
- बंडखोर एकनाथांकडे ‘इतकी’ आहे संपत्ती: 7 महागड्या गाड्या, 9 कोटींची घरं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तुल
- “कॅन्सरग्रस्त असताना कोणत्याही नेत्यांनी विचारपुस केली नाही”; बंडखोर आमदाराचा आरोप
- भास्करराव जाधव शिवसेनेच्या विरोधात बंड करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले..;
- “अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, मी याआधीच म्हटलं होतं”; चंद्रकांत पाटील