मुंबई : शिवसेनेच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्रातील राज्याच्या राजकीय वर्तुळात केंद्र बिंदु ठरले आहे. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. एक रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्रीपद असा एकनाथ शिंदे यांचा प्रवास असून त्यांच्याकडे अनेक प्रकाराच्या चारचाकी गाड्या आहेत.
ठाकरे अन् शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा; बंडखोर आमदारांना ठाकरेंचं आवाहन
2019 च्या विधानसभा निवडणुकच्या प्रतिज्ञापत्रात दाखल केलेल्या पत्रात त्यांनी आपली संपत्ती नमुद केली होती. यामध्ये त्यांच्याकडे 2 स्कार्पिओ, बेलेरो, इनोव्हा, अरमाडा आणि एक टेम्पो असून याची किंमत अंदाजे 46 लाख रूपये इतकी आहे. तसेच त्यांच्याकडे 4 लाख 12 हजाराचं 110 ग्रॅम सोनं स्वत:कडे तर 580 ग्रॅम सोनं त्यांच्या पत्नीकडे असून त्याची 25 लाख 87 हजार इतकी किंमत आहे. त्यासोबत त्यांच्याकडे रिव्हॉल्वर आणि एक पिस्तुल आहे.
बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यानंतर भाजपची मोठी खेळी; थेट राज्यपालांना पत्र
एकनाथ शिंदे यांनी शिवम ट्रान्सपोर्टमध्ये तीन लाखांची गुंतवणुक असुुन त्यात बॉम्बे फुट पॅकर्स आठ लाख तर शिवम एन्टरप्रायजेस हा 11 लाखांचा आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या नावे 28 लाख रूपयांची शेतजमीन आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे महाबळेश्वरमध्ये 5 हेक्टर म्हणजे 12 एकर जमीन, चिखलगाव, ठाणे याठिकाणी पत्नीच्या नावे 1.26 हेक्टर जमीन आहे. एकनाथ शिंदे यांनी 2019 मध्ये आपल्या नावे 3 कोटी 74 लाखाचं कर्ज असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये टीजेेएसबी चं 2 कोटी 61 लाखांचं गृहकर्ज आहे. याशिवाय श्रीमान रिअॅल्टीचं 98 लाखांच्या कर्जाचाही समावेश आहे.
“नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला
दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यात जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या 47 आमदारांचा पाठिंबा असून महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read also:
- “कॅन्सरग्रस्त असताना कोणत्याही नेत्यांनी विचारपुस केली नाही”; बंडखोर आमदाराचा आरोप
- भास्करराव जाधव शिवसेनेच्या विरोधात बंड करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले..;
- “अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, मी याआधीच म्हटलं होतं”; चंद्रकांत पाटील
- निलंबित करण्याचं पत्र देताच शिंदे गटातील आमदारांनी गाठलं थेट विधानभवन
- “बंडखोरीमागे भाजपचाच हात, त्यांची आग्राहुन सुटका करावीच लागेल”; ठाकरेंचा आता भाजपवर हल्लाबोल