मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडात 4 मंत्री आणि जवळपास 47 आमदार सामील झाले आहेत. काल कृषीमंत्री दादा भुसे देखील शिंदे गटात गुवाहाटी याठिकाणी पोहचले आहेत. गटनेतापदावरून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या. असं म्हणत त्यांनी दादा भुसे यांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदेंचं बंड अन् दोन दिवसातच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरीत
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपनेते केशव उपाध्यय यांनी त्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, गेले अडीच वर्ष शेतकरी विनंत्या करतोय, राऊत साहेब कधी चुकून तरी शेतकऱ्याबद्दल बोललाल का? ना सरकारने मदत केली. आज बर शेतकऱ्यांची आठवण झाली. नीट शेतीची माहिती असती, काळजी घेतली असती तर हातातलं पीक असं दुसर कुणी घेऊन नसत गेलं असंही ते म्हणाले.
डबलढोलकी कैलास पाटलांनापासून पक्षप्रमुखांनी सावध रहावं; तानाजी सावंतांनी केली पोलखोल
शिवसेनेचे तसेच अपक्ष 7 ते 8 आमदार हे आधी सुरत आणि मग पुढे गुवाहाटी येथे चार्टर्ड विमानाने जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिंदे गटात जवळपास 50 आमदार सामील झाल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सही केलेलं पत्र आज एकनाथ शिंदे गट राज्यपालांना तसेच विधान सभा उपाध्यक्षांकडे देणार आहेत.
Read also:
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
- सगळं ठरलंय, फडणवीस मुख्यमंत्री, अन् शिंदे साहेब उपमुख्यमंत्री; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
- “गुवाहाटीत रूसलेले शिवसेनेचे आमदार उद्या मुंबईत दाखल होतील” जयंत पाटील
- “बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असेल असं मला वाटत नाही”; अजित पवार