मुंबई : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पाडली. त्यात शरद पवारांनी आमदारांना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
राज्यात सुरू असलेल्या हालचालीवरून राष्ट्रवादीने देखील सावध भूमिका घेतली आहे. शिवसेना फुटण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न म्हणून राष्ट्रवादीकडून पाठिंबा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्याबाबत सर्व आमदारांना स्व: त शरद पवार कळवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाचा आता थेट धनुष्यबाणावरच दावा; शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याअगोदर शिवसेनेने अगोदर सांगितले पाहिजे. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर नाना पटोले यांनी देखील वर्षा निवासस्थान सोडल्याबाबत मुख्यमंत्र्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शासकीय वाहन सोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री अन् केंद्रात 2 मंत्रीपद
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात आता राजकीय पक्षांच्या बैठका सत्र सुरू आहेत. शरद पवार यांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काॅंग्रेसची देखील बैठक पार पडली. यामध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील उपस्थित होेते. त्यानंतर काॅंग्रेसची देखील बैठक सह्याद्री अतिती गृहावर पार पडली. त्यामुळे यावर आता काय निर्णय घेणार त्याकडे लक्ष आहे.
Read also:
- शिंदेंची समजुत काढायला गेलेले रविंद्र फाटकच दोन आमदारांना घेऊन गुवाहाटीत दाखल
- एकनाथ शिंदेंचं बंड अन् दोन दिवसातच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरीत
- डबलढोलकी कैलास पाटलांनापासून पक्षप्रमुखांनी सावध रहावं; तानाजी सावंतांनी केली पोलखोल
- “उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे”; राष्ट्रवादीचा ठाकरेंना भक्कम पाठिंबा
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली