मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी सुरूवातीला सुरत येथे आमदारांना घेऊन गेले होते. एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना पाठवलं होतं. मात्र आज रविंद्र फाटकच शिवसेनेच्या दोन आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटात 41 शिवसेनेचे मिळून एकूण 47 आमदार सोबत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक पाठवलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी फेटाळला. त्यानंतर आज रविंद्र फाटक यांनी दादा भुसे आणि संजय राठोड यांना घेऊन थेट गुवाहाटी गाठलं आहे. त्यांचा यासंदर्भात व्हिडीओ देखील जारी केला आहे. ज्यात दादा भुसे आणि संजय राठो़ड गुवाहाटीला रवाना झालेत.
शिंदे गटाचा आता थेट धनुष्यबाणावरच दावा; शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात
विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर माझ्याच गाडीत कैलास पाटील सुरतकडे रवाना झाले. पुढे गुजरातच्या चेकपोस्टवर गेल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली. त्याठिकाणी ते मला बोलले की आपल्याला माघारी गेले पाहिजे. त्यानंतर त्यांना माझीच गाडी घेऊन मुंबईला जाण्यासं सांगितले. त्यानंतर तो माघारी आला.
शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री अन् केंद्रात 2 मंत्रीपद
त्यानंतर त्यांनी आज जे काही पत्रकार परिषदेमध्ये आमच्यावर आरोप केले आहेत. असं काहीही झालं नाही. त्यामुळे यांनी फक्त लोकांची त्याचबरोबर पक्षप्रमुखांची दिशाभूल केली आहे. त्यांनी पक्षप्रमुखांसह माझी देखील दिशाभुल केली आहे. तसेच गुवाहाटीला आलेला प्रत्येक आमदार हा स्वत: च्या इच्छेनुसार आला आहे. त्यांच्यावर कोणाताही दबाव नसल्याचं तानाजी सांवत यांनी सांगितलं आहे.
Read also:
- एकनाथ शिंदेंचं बंड अन् दोन दिवसातच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरीत
- डबलढोलकी कैलास पाटलांनापासून पक्षप्रमुखांनी सावध रहावं; तानाजी सावंतांनी केली पोलखोल
- “उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे”; राष्ट्रवादीचा ठाकरेंना भक्कम पाठिंबा
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली